TRENDING:

मेलो तरी बेहत्तर पण..,महापौरपदाबद्दल उद्धव ठाकरे कडाडले, शिंदेंचं नावही घेतलं नाही!

Last Updated:

"मुंबईची लढाई चांगली लढलात, देशातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना हे नाव पुसून टाकलं जाणार आस सर्वाना वाटत तेव्हा त्यांना दाखवून दिलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई:  "त्यांनी काय मिळवलं, मुंबईवरचा भगवा तर उतरवला, काय महापौरपद? 25 वर्ष आपल्याकडे सत्ता होती. सगळे गड आपण राखले आहे. हे कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाही.  जे जे मुंबईचे गड होते, ते आजही शाबूत आहे, पण मुंबईकरांनी हे लक्षात घ्यावं, आपल्यासाठी जीव वाचवणारे कोण आहे, आपल्यासाठी धावून येणारे कोण आहे, याचा विचार केला पाहिजे" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महापौरपदाच्या वक्तव्यावर भाष्य केलं. तसंच, ठाकरे नाव पुसून टाकून मग काय होतंय ते पाहा. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कस शिकवलं. मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात लढत राहु' असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
News18
News18
advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सायन येथील षण्मुखानंद सभागृह इथं ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला.

"मुंबईची लढाई चांगली लढलात, देशातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना हे नाव पुसून टाकलं जाणार आस सर्वाना वाटत तेव्हा त्यांना दाखवून दिलं. मुंबईत देखील पैसे दिले जात होते, लिफाफे दिले जात होते. कोण आहोत आम्ही? ठाकरे नाव पुसून टाकून मग काय होतंय ते पाहा. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कस शिकवलं. मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात लढत राहु' असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

advertisement

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे 

- गद्दारी करून काय मिळवलंत? महापौरपद?

- मुंबईकरानी गड शाबूत राखले. आपला विचार करणारे कोण आहेत?

- ठाण्याच्या सभेत मी बोललो होतो तुम्हाला पैसे येतात मला घेता आले असते मीही जाऊ शकलो असतो पण यांच नाव मला घेता येणार नाही..

- दोन व्यापारी मुंबई तोडत असतील तर त्यांच्या विरोधात मुठभर मावळे घेऊन लढायला तयार आहे.

advertisement

- मला कोणाचं नाव नाही घ्यायचं.

- मी नाराज होऊ शकत नाही तुमच्यावर मला सगळे शिवसैनिक तुम्ही सारखे आहात..

- जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहे.

- अजून मी तुम्हाला काही दिला नाही तरीही तुम्ही तुमच्या जागेवर ठाम आहात.

- वाईट वाटत जेव्हा माणसं विकली जातात.

- मग कसं वाटतंय या लढाईला अर्थ आहे की नाही.

advertisement

- मग बातमी येते की, एका साध्या गृहिणीला शिवसेनेने नगरसेवक केले होते व अभिमान वाटतो.

- हे त्या विजयावरून बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे, असं वाटतं.

- त्या पराभवामधून ते सुख खूप मोठं वाटतं.

- शिवसेना हा पक्ष नाही शिवसेना हा विचार आहे.

- शिवसेना अंगार आहे आणि अन्यायग्रस्त लोकांच्या हृदयात पटलेली मशाल आहे.

advertisement

- सुभाष देसाई यांनी काही जाहीर केलेला कार्यक्रम मोठा आहे.

- शिवसेनेने मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काय केलं हे प्रश्न विचारणार आणि स्वतःला विचारावे.

- शिवसेना नसते तर महापालिका आणि मंत्रालय यांना दिसलेच नसतं हे शिवसेनेचे पहिलं कर्तृत्व...

- नवीन नवीन क्षेत्रामध्ये आपल्या तरुण-तरुणींना कसं रोटी मिळून द्यायची हे शिवसेनेचा पहिला काम आहे..

- याला फोड त्याला फोड मराठी माणूस मेला काही जगला काय यांना काय फरक आहे..

- शिवसेनेचा जन्म हा घरातील चूल पेटवण्यासाठी झाला आहे.

- आज बाळासाहेब आपल्याला विचारत असतील तेव्हा त्यांना सांगा की, तुम्ही जी निष्ठा शिकवली त्या निष्ठेचा बाजार नाही मांडला.

- एक गद्दार गेला तरी चालेच, निष्ठावान घ्यायचे...

- मुंबईमध्ये मी शाखांमध्ये पुन्हा जाणार आहे.

- जिथे जिंकलो तिथे जाणारच पण तिथे पराभव झाला तर शाखाच मुद्दाम जाणार आहे.

- ज्यांना ज्यांना जाग आली आहे ते सर्व शिवसेनेच्या भगव्या सोबत आले आहेत.

- आज पासून जय महाराष्ट्राचा उद्घोष समोरच्या काळजात धडधड वाढली पाहिजे असा झाला पाहिजे,

- समोरच्या काळजात धडकी भरेल असा उद्गार करा.

- हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र हा महाराष्ट्र धर्म आहे.

- शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज हे वळवळणारे हिंदुत्ववाले राहिले नसते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
म्हणून सायकल घेऊन निघालो, पुण्याच्या सायकल टूरमध्ये एंट्री करणारे आप्पा आले समोर
सर्व पहा

- महाराष्ट्र धर्म आणि आपला देश आपल्याला वाचवायचा आहे हे पवित्र काम केल्याशिवाय आपण राहणार नाही.

मराठी बातम्या/मुंबई/
मेलो तरी बेहत्तर पण..,महापौरपदाबद्दल उद्धव ठाकरे कडाडले, शिंदेंचं नावही घेतलं नाही!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल