मुंबई: एकीकडे भाजपचा महापौर मुंबई पालिकेत विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने "तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि शौचालयाला संचालय असे म्हणता. या सगळ्या तुम्ही स्वतः तयार केलेल्या समस्या आहेत. दर वेळी येता प्रतिज्ञापत्र देता आणि वेळ मारून नेता. टॉम अँड जेरी सारखं सुरू आहे. इथून काढलं अतिक्रमण की तिथे येतं"असं म्हणत मुंबई पालिकेला चांगलंच फटकारलं आहे.
advertisement
पवई येथील एका शाळेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती घुगे यांनी मुंबई पालिकेच्या वकिलांना चांगलंच फैलावर घेतलं, तसंच, हिरानंदानी परिसरातील सुमारे 90 फूट रुंदीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचे चित्र पाहिल्यावर नाराजीही व्यक्त केली.
काय घडलं कोर्टात?
"पालिकेच्या वकील फिरते शौचालय याबाबत विषय समजून सांगत असताना त्यांनी शौचालय ला संचालय आहे असं संबोधलं. त्यामुळे न्यायमूर्ती घुगे यांनी "तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि शौचालयाला संचालय असे म्हणता' हे कसं चालणार आहे. अतिक्रमण काढण्याची तुमची इच्छा नाही, तुम्ही अतिक्रमण करणाऱ्यांना मुंबई शरण दिली. आम्ही या आधी देखील अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. 5-10 दिवसांचा पगार कापला आहे, निलंबन केलं आहे. आम्ही हे करू शकतो. झोपडपट्टीधारक रस्त्यावर शौचास बसतात म्हणून तुम्ही त्यांना शौचालय आणि पाण्याचा टँकर दिला. फिरतं शौचायलंय हटावता येत नाही म्हणता. त्याला चाक असतं. तिथे कुणासाठी ठेवलंय? अतिक्रमण पाडून टाकू, अशा ठिकाणी पाठवू जिथे पाणी सुद्धा मिळणार नाही' असं म्हणत न्यायमूर्ती घुगे यांनी पालिकेच्या वकिलांना चांगलंच फैलावर घेतलं.
"उद्या प्रभागातील सर्वोच्च मनपा अधिकाऱ्याला आणि पोलीस अधिकाऱ्याला कोर्टात बोलवा. या तुम्ही स्वतः तयार केलेल्या समस्या आहेत. दर वेळी येता प्रतिज्ञापत्र देता आणि वेळ मारून नेता. टॉम अँड जेरी सारखं सुरू आहे इथून काढलं अतिक्रमण की तिथे येतं, असं म्हणत न्यायमूर्तींनी मुंबई पालिकेला खडेबोल सुनावले.
या रस्त्याच्या कडेला असंख्य झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत, ज्यामुळे शाळकरी मुले आणि सामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे. या भागात फिरते शौचालय आणून ठेवल्यामुळे सुद्धा हे फिरत कां नाहीये? झोपडपट्टी धाराकांसाठी ठेवलंय का? असा प्रश्न न्यायालयाने विचारला.
सुनावणी दरम्यान उच्चन्यायालयाच्या नजीक असलेल्या पी डिमेलो रस्त्याबाबत ही न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. "पी डिमेलो मार्ग आधी तीन गाड्या जातील इतका मोठा होता. आता एकच गाडी जाते, अतिक्रमण झालं आहे", असं म्हणत न्यायाधिशांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण काय?
पवई येथील एका शाळेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश घुगे हिरानंदानी परिसरातील सुमारे 90 फूट रुंदीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचे चित्र पाहिल्यावर नाराजी व्यक्त केली. फिरते शौचालय तिथ एकच जागी ठेवण्यात आले त्यावरही न्यायाधीशांनी आक्षेप घेतला
