उज्जैन : बाबा महाकालची नगरीमध्ये काशीबाई ताई नावाची या महिलेला सर्वजण ओळखतात. ताई नावाने त्या प्रसिद्ध आहेत. काशीबाई ताई यांच्यावर महाकालची कृपाच आहे, असे मानले जाते. आतापर्यंत त्यांनी कोणतेही ऑपरेशन न करता 1 लाख पेक्षा जास्त नॉरमल डिलिव्हरी केल्या आहेत. ताईची खासियत म्हणजे त्या गर्भवती महिलेला पाहूनच प्रसूतीची वेळ सांगून द्यायच्या. इतकेच नव्हे तर ताईची लोकप्रियता इतकी राहिली की, त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारही होत्या.
advertisement
काशीबाई यांचा जन्म 1924 मध्ये देवास जवळील गावात झाला होता. यानंतर त्यांचे कुटुंब हे उज्जैन येथे राहिले. ताईचे लग्न हे 13 वर्षांच्या असतानाच झाले होते. ताईंनी आरोग्य विभागातून प्रशिक्षण घेऊन वयाच्या 19 व्या वर्षी त्या सरकारी नोकरीमध्ये रूजू झाल्या. यानंतर तब्बल 36 वर्षे ताईंनी आरोग्य विभागात सेवा केली. केवळ उज्जैन शहरातच नव्हे तर जवळपासच्या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्येही त्यांनी सेवा दिली.
काही वर्षांनी, त्या उज्जैनला आल्या आणि त्यांनी निवृत्त होईपर्यंत प्रसूती केंद्रात सुईण म्हणजे प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री म्हणून काम केले. यानंतर मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या.
सेवानिवृत्तीनंतरही लोकांनी ताईंना सोडले नाही. त्यामुळे त्यांनी घरातूनच सेवा देणे सुरू केली. घरी गरोदर स्त्रिया त्यांना दाखवायला यायच्या आणि आपल्या बाळाची अवस्था जाणून घ्यायच्या. याशिवाय प्रत्येकजण डिलिव्हरीच्या तारखेबद्दलही विचारायच्या. यावेळी ताई कोणत्याही मशीनशिवाय फक्त त्यांच्या अनुभवावरून डिलिव्हरीची तारीख सांगायच्या आणि विशेष म्हणजे जवळजवळ ती तारीख बरोबर असायची. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. 3 वर्षांपूर्वीपर्यंत त्यांनी घरूनच सेवा केली.
घरात मांजर आली तर समजा कल्याणच झालं, भरू शकते तिजोरी; वाचा, तुमच्या कामाची माहिती..
काशीबाई ताई यांचे पूत्र अशोक पंवार यांनी सांगितले की, आईचे वय आता 100 वर्षे आहे. ताई आता थोड्या अस्वस्थ असतात. मात्र, आता त्या आमच्यासोबत आहेत. वयामुळे त्यांना आता चालण्यास त्रास होत आहे. आत्तापर्यंत ताईंनी शहरातील अनेक बड्या नेत्यांपर्यंत आणि हिंदू-मुस्लीम समाजातील अनेक महिलांची यशस्वीपणे डिलिव्हरी केली. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात नेले असता शहरातील टॉपचे डॉक्टर डॉ. अजय निगम यांनी त्याला पाहताच ओळखले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ताई या सरकारी सेवेत असताना त्यांनी एक लाखाहून अधिक प्रसूती झाल्या असतील.
नगरसेवकही बनल्या -
ताईंची खासियत आणि लोकप्रियता इतकी वाढली की 1999 मध्ये ताईंनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेसकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. त्यांनी राजकीय कारकिर्दीतही सेवा करून लोकांची मने जिंकली आहेत.
