गणपतीची ही मूर्ती बनवणाऱ्या समितीचे अध्यक्ष कुबेंद्रन यांनी सांगितलं की, नागाई विश्वरूप विनायक समितीने 83 अंजिराच्या झाडांनी बनवलेली ही विशाल गणेशमूर्ती विसर्जित केली जाणार नाही. परंतु भगवान गणपती आपल्या भक्तांना सदैव आशीर्वाद देतील. त्यांनी सांगितलं की, ही पवित्र मूर्ती अंजिराच्या झाडावर कोरली गेली आहे आणि गणपतीची ही अप्रतिम प्रतिमा कोरण्याचं मोठे काम मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यातच सुरू झालं होतं.
advertisement
सोन्याचा रथ, 58 मूर्ती! समुद्रकिनारी वसलेल्या बाप्पाच्या 'या' मंदिराबाबत माहितीये?
"आम्ही 4 टन वजनाची ही मूर्ती बनवण्यासाठी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च केले आणि एक मोठा रथ देखील बनवला ज्यावर भगवान बसतील," असं कुबेरन यांनी पीटीआयला सांगितलं. कुबेंद्रन म्हणाले होते, की, "गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला गेला नाही. त्यामुळे यावेळी मी पवित्र अंजिराच्या झाडापासून गणेशमूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला, जे माझं गेल्या 15 वर्षांपासूनचं स्वप्न होतं." कुबेरनच्या मते, अथी (अंजीर) हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. कारण हे वृक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांशी संबंधित आहे. तसंच अंजिराचं झाड देशात सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं.
सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या नागपट्टीनममध्ये समितीच्या मंजुरीनंतर मूर्ती उभारण्यासाठी निधी जमा करण्यात आला. मग कावेरी डेल्टा जिल्ह्यांतील कच्च्या अंजिराच्या झाडांसह ही सुंदर प्रतिमा तयार करण्यासाठी सुमारे 8 महिने लागले. "आम्ही पिल्लैयारची (गणेशाचे दुसरे नाव) मूर्ती बनवण्यासाठी रात्रंदिवस काम केलं," असं थिरुनावुकारासू म्हणाले.
कुबेरन यांनी दावा केला, की तामिळनाडूतील कांचीपुरम येथील कोझीकुठी गावातील श्री श्रीनिवास पेरुमल मायावरमच्या जवळ कावेरी नदीच्या काठी भगवान विष्णूचा अवतार असलेला अथी वरादार आहे. जो 40 वर्षांतून एकदा भक्तांना दिसतो." श्री श्रीनिवास पेरुमल मंदिराचे प्रमुख देवता 20 फूट उंच आणि अंजीराच्या लाकडापासून बनवलेले आहेत.