इतर राज्यांतून मदतीचा ओघ:
इतर राज्यांनी केरळला मदतीचा हात पुढे केला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, "केरळ बँकेने सीएमडीआरएफला आधीच 50 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपये आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 5 कोटी रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. राज्याने दोन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर केला आहे. सार्वजनिक कार्यक्रम आणि समारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. आम्ही विनंती करतो की शोक काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवावा. असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
नेमकं काय घडलं?
मंगळवारी सकाळी मेप्पडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन झाले, ज्यामध्ये मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत असून मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बाधित भागात अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफची अतिरिक्त टीम वायनाडला रवाना झाली आहे. कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांनाही बचाव कार्यात मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राहुल गांधींनी उठवला आवाज:
काँग्रेस नेते राहुल गांधींसाठी वायनाडच्या जनतेने नेहमीचं प्रेम दिले. त्यामुळे राहुल गांधींनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. पूर्ण ताकदीने वायनाडला केंद्राने मदत करावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
'मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आमच्याकडे...' ओबीसी नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!