Maratha Reservation: 'मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आमच्याकडे...' ओबीसी नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
मराठा आरक्षणाचा खरा फॉर्म्युला आमच्याकडे, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. पण सत्ता आली तरच.......
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्यात रोज नव्या अपडेट्स समोर येत आहेत. एकीकडे मनोज जरांगेंनी काही काळासाठी मराठा आंदोलन स्थगित केलं, अस असताना ओबीसी आरक्षण बचाव यात्रा मात्र सुरू आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये यात्रेदरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण भाष्य केलं. त्यामुळे राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.
'मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आमच्याकडे'
"मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. मात्र, आमचे सरकार आले तर आम्ही तो अंमलात आणणार" असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. आरक्षण बचाव यात्रे दरम्यान बीडच्या अंबाजोगाईमध्ये ते बोलत होते.
advertisement
'दंगल घडवण्याचा शरद पवारांचा मनसुबा'
पुढे बोलताना म्हणाले, "आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती, तर शरद पवार यांचे मणिपूर सारखी दंगल घडवण्याचे मनसुबे होते. शरद पवार यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही" असा गंभीर आरोप देखील यावेळी त्यांनी केला. मधल्या काळात भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीवर भाष्य करताना मात्र प्रकाश आंबेडकरांनी कोणतंही ठोस उत्तर देणं टाळलं, रस्त्यावरच्या भेटीत काय चर्चा होणार असा टोला यावेळी त्यांना लगावला. येत्या 7 ऑगस्ट रोजी होत असणाऱ्या मंडल दिनाचे आमंत्रण पत्र आम्ही छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना दिले आहे. "यामध्ये ते फक्त भेटणार की सहभाग घेणार ते ठरवतील!'
advertisement
ओबीसी आरक्षण बचावचा काय परिणाम:
view commentsएकीकडे मनोज जरांगेंनी जरी मराठा आंदोलन स्थगित केलं असलं तरी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा मात्र सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी मराठा आरक्षणाचा वादळाचा जोर कमी झालाय का, अशी चर्चा असताना ओबीसींमधील आरक्षण बचावची भावना या यात्रेमुळे तेवत आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण फॅक्टरचा येणाऱ्या निवडणुकीत नेमका कसा परिणाम होणार आहे, याचे अंदाज बांधण अवघड आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2024 6:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation: 'मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आमच्याकडे...' ओबीसी नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!


