Maharashtra Politics: 'त्या पेनड्राईव्हची पुंगळी कर आणि...' विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ भिडल्या!
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
कौटुंबिक वादाचं रूपांतर राजकीय वादात झालं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपच्या चित्रा वाघ भिडल्या...
मुंबई: राजकारणात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडलेल्या आपण नेहमी पाहतचं असतो. पण आता एका कौटुंबिक वादाची परिणिती राजकीय चिखलफेकीत झाल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक धुमश्चक्री पाहायला मिळाली. नेमकं काय झालं?
विद्या चव्हाणांचे वाघ यांच्यावर आरोप काय? :
विद्या चव्हाण यांच्या सून डॉ. गौरी चव्हाण यांनी काळी महिन्यांपूर्वी माध्यमांसमोर येत ' विद्या चव्हाण यांच्या कुटुंबात आपला छळ आणि विनयभंग झाला,' असा आरोप माध्यमांसमोर केला. 'दोन्ही अपत्य मुलगी झाल्याने आपल्याला घराबाहेर काढण्यात' आलं अशा गंभीर स्वरूपाचे आरोप गौरी चव्हाण यांनी केले होते. याच मुद्द्यावर विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली, आणि काही ऑडीओ क्लिप्स ऐकवल्या, ज्यामध्ये चित्रा वाघ आणि सून गौरी चव्हाण यांच्यातलं संभाषण ऐकायला येत आहे. ज्यावरून विद्या चव्हाण यांनी आरोप केला की, " चित्रा वाघ आणि कौटुंबिक वादात ढवळाढवळ करत घर फोडण्याचा आणि बदनामीचा प्रयत्न केला."
advertisement
ऑडिओ क्लिप्समध्ये नेमकं काय?
या ऑडीओ क्सिप्सची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. असं असलं तरी यामध्ये चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांची सून गौरी चव्हाण यांच्यात संभाषण झाल्याचं दिसत आहे. यावेळी त्या ठिकाणी एक डॉक्टरही उपस्थित असल्याचं दिसत आहे.
चित्रा वाघ यांचा हल्लाबोल:
विद्या चव्हाणांनी केलेल्या आरोपानंतर भाजपच्या नेत्या चित्रा चवताळल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट विद्या चव्हाणांसह शरद पवारांवर देखील हल्ला चढवला. चित्रा वाघ म्हणाला, " विद्याताई मी जर तोंड उघडलं तर शरद पवार साहेबांना त्रास होईल, तुम्ही तुमच्या सूनेचा घरात छळ केला. हे सत्य आहे. एवढच असेल तर अनिल देशमुखांची ऑ़़डीओ क्लिप आम्ही क्षणार्धात समोर आणू. आम्हाला बोलायला भाग पाडू नका." अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं.
advertisement
आता ज्या प्रकारे कौटुंबिक वादाचं राजकीय वादात रूपांतर झालं. तसं आता हा सुरू झालेला नेमका कुठेपर्यंत जाऊन थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर असताना असे राजकारणाच्या पलीकडचे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढू शकता, हे मात्र स्पष्ट आहे. यावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2024 5:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Politics: 'त्या पेनड्राईव्हची पुंगळी कर आणि...' विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ भिडल्या!