Pune-Nashik Highway: 4 वर्षापूर्वी रस्त्यासाठी बांधकामं हटवली, पण 7 हजार कोटीचा प्रकल्प फक्त कागदावरच, पुणे-नाशिक महामार्गाचा 'ट्रॅफिक जॅम' कधी सुटणार?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुढील वर्षी नाशिकमध्ये 'कुंभमेळा' सोहळा आहे. या काळात महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे. 'एलिव्हेटेड' मार्ग वर्षभरात पूर्ण होणे अशक्य आहे
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीने आता उग्र रूप धारण केले आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर या २८ किलोमीटरच्या पट्ट्यात दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. भोसरी एमआयडीसी असो किंवा मोशी आणि चाकणचा औद्योगिक परिसर, हा संपूर्ण मार्ग वाहतूक कोंडीच्या चक्रात अडकला आहे. त्यामुळे, सर्वसामान्य पुणेकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने रुंदीकरण, सेवारस्ते आणि उन्नत मार्गाचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार वर्षांपूर्वीच रस्ते रुंदीकरणासाठी अडथळे ठरणारी बांधकामे हटवली होती, मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाचा 'मुहूर्त' सापडलेला नाही. सुमारे ७,८०८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता केवळ कागदावरच रेंगाळत असल्याचे चित्र आहे.
advertisement
कुंभमेळा सोहळ्यावेळी काय होणार?
पुढील वर्षी नाशिकमध्ये 'कुंभमेळा' सोहळा आहे. या काळात महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे. 'एलिव्हेटेड' मार्ग वर्षभरात पूर्ण होणे अशक्य असल्याने, किमान सेवा रस्ते तरी तातडीने विकसित करणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने आताच पावले उचलली नाहीत, तर येणारा काळ प्रवाशांसाठी अधिक कठीण होणार आहे. सध्या राजगुरुनगरमध्ये भूसंपादनाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम २५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
advertisement
नाशिक फाटा ते राजगुरुनगर हे अंतर या प्रकल्पाने अवघ्या काही मिनिटांवर येणार असले, तरी या महामार्गाचे पूर्णत्व कधी होणार, याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune-Nashik Highway: 4 वर्षापूर्वी रस्त्यासाठी बांधकामं हटवली, पण 7 हजार कोटीचा प्रकल्प फक्त कागदावरच, पुणे-नाशिक महामार्गाचा 'ट्रॅफिक जॅम' कधी सुटणार?








