TRENDING:

Delhi Elections 2025 Arvind Kejriwal : केजरीवालांचं हिंदू कार्डने भाजपलाच थेट चॅलेंज, ''आता ही योजना थांबवण्याचा प्रयत्नच करा...''

Last Updated:

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे भाजपनेदेखील कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला चेकमेट देत केजरीवालांनी एका योजनेवरून आव्हान दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासाठी काही महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्याआधीच दिल्लीचं मैदान मारण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे भाजपनेदेखील कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला चेकमेट देत केजरीवालांनी एका योजनेवरून आव्हान दिले आहे.
केजरीवालांचं हिंदू कार्डने भाजपलाच थेट चॅलेंज, ''आता ही योजना थांबवण्याचा प्रयत्नच करा...''
केजरीवालांचं हिंदू कार्डने भाजपलाच थेट चॅलेंज, ''आता ही योजना थांबवण्याचा प्रयत्नच करा...''
advertisement

आपच्या योजनेला खोडा...

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिला सन्मान योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार दिल्लीतील महिलांना 2100 रुपये मिळणार होते. मात्र, भाजपने आक्षेप घेत योजना थांबवण्याचा प्रयत्न केला. आता केजरीवाल यांनी हिंदू कार्ड खेळत भाजपला उलट आव्हान दिले आहे.

केजरीवालांचं हिंदू कार्ड...

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली. आज पत्रकार परिषदेत दिल्लीत आम आदमी पार्टीचे पुन्हा सरकार आल्यास पुजारी आणि पुरोहितांनाही दरमहा 18 हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याची घोषणा केली. या योजनेनुसार, दिल्लीत पुजारी, पुरोहितांची नोंदणी करण्यात येणार आहे.आपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: मंगळवारपासून कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरातून नोंदणी मोहीम सुरू करणार आहेत.

advertisement

भाजपला आव्हान...

यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांना थेट आव्हान दिले. भाजपने महिला सन्मान योजनेची नोंदणी मोहीम थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची नोंदणी मोहीम थांबवून दाखवावी असे थेट चॅलेंज केजरीवाल यांनी केले आहे. त्यामुळे आता केजरीवालांच्या हिंदू कार्डला भाजप उत्तर कसे देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

केजरीवाल यांच भाजपला आव्हान...

advertisement

अरविंद केजरीवाल यांनी भाजपला हे आव्हान देऊन त्यांच्याच हिंदुत्वाच्या मैदानावर कोंडी केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी केजरीवाल यांच्या योजनांना विरोध करणाऱ्या भाजपने या योजनेलाही विरोध केल्यास भाजप हिंदूविरोधी असल्याचा मुद्दा आपला करता येईल. त्यामुळे हिंदुत्वाच्या नेरेटिव्हला धक्का बसू शकतो. त्यामुळे भाजप या योजनेला विरोध करणार की समर्थन करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Delhi Elections 2025 Arvind Kejriwal : केजरीवालांचं हिंदू कार्डने भाजपलाच थेट चॅलेंज, ''आता ही योजना थांबवण्याचा प्रयत्नच करा...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल