TRENDING:

बिहारच्या नालंदामध्ये मंदिरात चेंगराचेंगरी, 8 भाविकांचा दर्शनादरम्यान मृत्यू

Last Updated:

बिहार नालंद्यातील मगडा शीतला मंदिरात चेंगराचेंगरी, किमान ८ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी, पोलिस आणि रुग्णवाहिका बचावकार्यरत, परिसरात शोककळा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिहारच्या नालंदा इथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मगडा शीतला मंदिरात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. भाविकांनी मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी केली. ही गर्दी अनियंत्रीत झाल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत.
News18
News18
advertisement

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शीतला माता मंदिर परिसरात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

बिहार शरीफमधील मघडा भागात असलेल्या माता शीतला अष्टमीच्या दरबारात मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने मंदिरात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. सकाळच्या सुमारास अचानक काही कारणास्तव लोकांमध्ये अफरातफरी माजली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर भीषण चेंगराचेंगरीत झाले.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी बिहार शरीफमधील मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तातडीनं मंदिर परिसर रिकामा करण्याचे काम सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
बिहारच्या नालंदामध्ये मंदिरात चेंगराचेंगरी, 8 भाविकांचा दर्शनादरम्यान मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल