हाय स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर
भारताच्या लष्करी स्थळांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. भारताने अनेक धोके निष्प्रभ केले, परंतु पाकिस्तानने 26 हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी उधमपूर, भुज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर आमच्या उपकरणे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान केलं. तसेच पाकिस्तानने पहाटे 1.40 वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे.
advertisement
व्यावसायिक विमान कंपन्यांच्या मागे लपून हल्ला
एवढंच नाही तर, पाकिस्तानची लढाऊ विमाने पुन्हा लाहोरहून व्यावसायिक विमान कंपन्यांच्या मागे लपून नागरिकांना धोक्यात आणत आहेत, असंही कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या लाहोर येथून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानाच्या कव्हरमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा गैरवापर केला गेला ही चिंतेची बाब आहे. जेणेकरून ते त्यांच्या कारवाया लपवू शकतील. अशा युक्त्यांमुळे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेला नागरी सुरक्षा सुनिश्चित करताना मोठ्या संयमाने काम करण्यास भाग पाडले गेले. पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांवर रुग्णालये आणि शाळा परिसरांना निंदनीय आणि अव्यावसायिक कृत्य केले. यातून पुन्हा एकदा नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची त्यांची बेजबाबदार प्रवृत्ती उघड झाल्याचं कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटलं होतं.
S 400 च्या हल्ल्याचा खोटा दावा
दरम्यान, पाकिस्तानने भारतीय S-400 प्रणाली नष्ट केल्याचे, सुरत आणि सिरसा येथील हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे करून सतत चुकीची माहिती देणारी मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने पसरवलेल्या या खोट्या दाव्यांचे भारत स्पष्टपणे खंडन करतो, असं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी म्हटलं आहे.