खरंतर मान्सून आणि पाऊस सुरू झाला की अरावलीच्या दऱ्या हिरवीगार होतात. डोंगरावरील हिरवाईमुळे गोराम घाटाचे दृश्य पाहण्यासारखे असते. आकर्षक आणि मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी बाहेरून पर्यटकही मारवाडमध्ये येतात. अनेक वेळा हिरवाईचा आनंद लुटण्यासाठी गोराम घाट रेल्वे पुलावरून लोक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. शनिवारीही असाच काहीसा प्रकार घडला, जेव्हा पती-पत्नी जीव धोक्यात घालून रेल्वे पुलावर रील बनवत होते. या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता
advertisement
2 वर्षापूर्वी प्रेमविवाह; आता 5 मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक अत्याचार, मग जिवंत जाळलं
रील बनवण्यात हे जोडपं इतकं व्यस्त झालं, की त्यांना रुळावर येणाऱ्या ट्रेनचा आवाजही ऐकू आला नाही. अचानक समोरून येणारी ट्रेन पाहून पती-पत्नी घाबरले आणि त्यांनी तातडीने रेल्वे पुलावरून खोल खड्ड्यात उडी मारली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागरीतील कलाल पिपलिया येथे राहणारा राहुल हा त्याची पत्नी जान्हवी, साडू आणि मेहुणीसोबत गोरामघाटावर दर्शनासाठी आला होता. तिथे पती-पत्नी गोरामघाट रेल्वे पुलावर रील काढण्यासाठी मध्यभागी थांबले, तर मेहुणी आणि साडू पुढे गेले. दरम्यान समोरून एक ट्रेन आली आणि घाबरून जान्हवी आणि राहुल यांनी रेल्वे पुलाच्या रुळावरून खड्ड्यात उडी मारली, दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी सोजात रुग्णालयात आणण्यात आलं. राहुलची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला सोजत येथूनच जोधपूरला रेफर करण्यात आलं. दरम्यान, जान्हवीला पाली येथील बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.