2 वर्षापूर्वी प्रेमविवाह; आता 5 मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक अत्याचार, मग जिवंत जाळलं

Last Updated:

एका पतीने आधी आपल्या पाच मित्रांना घरी बोलवलं. त्यांच्यासोबत बसून दारू प्यायला. यानंतर...

पत्नीला जिवंत जाळलं (प्रतिकात्मक फोटो)
पत्नीला जिवंत जाळलं (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ : पती पत्नीचं नातं हे अतिशय खास असतं. ते प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. मात्र, कधीकधी या नात्यातही काही अशा घटना घडतात, ज्या सगळ्यांनाच पुरत्या हादरवून सोडतात. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. यात एका पतीने आधी आपल्या पाच मित्रांना घरी बोलवलं. त्यांच्यासोबत बसून दारू प्यायला. यानंतर त्याच्या पाचही मित्रांनी त्याच्या पत्नीवर गँगरेप केला. ही धक्कादायक घटना रायबरेलीमधून समोर आली आहे.
हे सगळं इथेच थांबलं नाही. तर, यानंतर पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळण्यात आलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चुरुवा गावात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जितू सिंहचा प्रेमविवाह दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील एका मुलीसोबत झाला होता. जितू सिंहने शनिवारी आपल्या पाच मित्रांना घरी बोलावलं, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. आधी त्यांनी एकत्र दारू प्यायली, त्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.
advertisement
प्रकरण लपवण्यासाठी त्यांनी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस स्टेशन प्रभारी बछरावां, विजेंद्र शर्मा घटनास्थळी पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं की जितूच्या पत्नीचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाला नाही. या प्रकरणावरून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बराच वेळ वादावादी झाली. जितू सिंहने पत्नीवर आपल्याच पाच साथीदारांनी सामूहिक बलात्कार करायला सांगितल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यानंतर तिची हत्या करण्यात आली.
advertisement
याप्रकरणी सीओ महाराजगंज यदुराम पाल यांनी सांगितलं की, या प्रकरणातील आरोपी जितू हा चुरवा येथील रहिवासी असून त्याने उत्तराखंडमधील एका मुलीशी लग्न केलं होतं. पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून जितूला अटक करण्यात आली आहे. इतर दोषींवर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या/क्राइम/
2 वर्षापूर्वी प्रेमविवाह; आता 5 मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक अत्याचार, मग जिवंत जाळलं
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement