Recipe Video: घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी; सोपी रेसिपी वाचा
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
घरच्या घरी नवनवीन आणि चविष्ट पदार्थ बनवण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. विशेषतः झटपट, सोपी आणि रेस्टॉरंटसारखी चव देणाऱ्या रेसिपींना गृहिणींसह तरुणाईकडूनही मोठी पसंती मिळत आहे.
सध्या घरच्या घरी नवनवीन आणि चविष्ट पदार्थ बनवण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. विशेषतः झटपट, सोपी आणि रेस्टॉरंटसारखी चव देणाऱ्या रेसिपींना गृहिणींसह तरुणाईकडूनही मोठी पसंती मिळत आहे. पार्टी, वाढदिवस किंवा वीकेंड स्पेशल मेन्यूमध्ये काहीतरी वेगळं हवं असेल तर क्रिस्पी पनीर लॉलिपॉप हा पदार्थ चर्चेत आला आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि परफेक्ट कुरकुरीतपणामुळे हा पदार्थ घरा घरात लोकप्रिय ठरत आहे. तर अशातच आज आपण जाणून घेणार आहोत घरच्या घरी सहज करता येणारी क्रिस्पी पनीर लॉलीपॉपची खास रेसिपी.
साहित्य:
- पनीर – 250 ग्रॅम (मोठे क्यूब्स)
- कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
- लाल तिखट – 1 टीस्पून (चवीनुसार)
- हळद – ¼ टीस्पून
- धणे-जिरे पावडर – 1 टीस्पून
- गरम मसाला – ½ टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- तेल – तळण्यासाठी
- लाकडी स्टिक्स / टूथपिक्स
कृती:
- एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर आणि सर्व घरचे मसाले, घ्या.
- थोडं पाणी घालून घट्ट पण स्मूथ बॅटर तयार करा.
- पनीरचे तुकडे या बॅटरमध्ये नीट माखून घ्या.
- मध्यम आचेवर तेल गरम करून पनीरचे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- आपले क्रिस्पी पनीर लॉलीपॉप तयार होतील.
advertisement
सर्व्हिंग आयडिया:
- हिरवी कोथिंबीर–पुदिन्याची चटणी
- दही + मीठ + थोडं लाल तिखट असा झटपट डिप
- लिंबाच्या फोडी (फ्रेश टेस्टसाठी)
टिप्स:
- पनीर मऊ ठेवण्यासाठी तळण्याआधी 5 मिनिटं कोमट पाण्यात भिजवून घ्या.
- जास्त कुरकुरीतपणासाठी रव्याबरोबर थोडे कॉर्नफ्लेक्स चुरे मिसळू शकता.
- उपवास नसताना हा प्रकार चहासोबत मस्त लागतो
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 8:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Recipe Video: घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी; सोपी रेसिपी वाचा







