अजब! 5 वर्षांचं रिलेशन; लग्नासाठी वरात घेऊन पोहोचला नवरदेव, सासरच झालेलं गायब, रात्रभर शोधलं अन्..

Last Updated:

लग्नाच्या वरातीतील पाहुण्यांना वधू आणि तिच्या कुटुंबीयांबाबत काहीही न सापडल्याने शुक्रवारी सकाळी लग्नाची वरात तशीच परतली.

लग्नाआधी नवरी फरार (प्रतिकात्मक फोटो)
लग्नाआधी नवरी फरार (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ : एका गावात मोठ्या थाटामाटात वरात काढण्यात आली. बँडच्या तालावर नाचत-गाणी गात लखनऊच्या रहिमाबादच्या हसिमपूर गावात लग्नाची वरात पोहोचली. यानंतर रात्रभर लग्नात आलेल्या पाहुण्यांसह वराने सासरच्या घराचा शोध घेतला. पण लग्नातील पाहुण्यांना ना मंडप दिसला ना नवरीचं घर. लग्नाच्या वरातीतील पाहुण्यांना वधू आणि तिच्या कुटुंबीयांबाबत काहीही न सापडल्याने शुक्रवारी सकाळी लग्नाची वरात तशीच परतली.
शनिवारी नवरदेवाने रहिमाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गरज असल्याचं भासवून मुलीने चार वर्षांत 5 लाख रुपये उकळल्याचा सोनूचा आरोप आहे. तरुणीच्या बोलण्यात येऊन तो पैसे देत राहिला. आपली इतकी फसवणूक होत आहे हे त्याला माहीत नव्हतं. मुलीसोबत तिचे वडीलही अनेकदा फोन करून त्यांचं लग्न लावून देण्याबाबत बोलायचे.
advertisement
उन्नावच्या औरास दलेलपूरचा रहिवासी असलेल्या सोनूच्या म्हणण्यानुसार, चार वर्षांपूर्वी चंदिगडमध्ये काजल नावाच्या मुलीशी त्याची भेट झाली. लखनौच्या रहिमाबाद येथील हसिमपूर गावात आपलं घर असल्याचं तिने सांगितलं होतं. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अनेकदा बोलणंही होऊ लागलं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही काळापूर्वी काजलने तिचे वडील शीशपाल यांच्याशीही त्याचं बोलणं करून दिलं. तिच्या वडिलांनी फोनवरच 11 जुलै ही लग्नाची तारीख निश्चित केली. 11 जुलै रोजी नवरदेव पाहुण्यांसह दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा कळलं की या नावाने येथे कोणीही राहत नाही. या तक्रारीवरून तपास सुरू असल्याची माहिती रहिमाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी यांनी दिली.
advertisement
सोनूच्या म्हणण्यानुसार, 10 जुलैच्या रात्री त्याचं काजलशी बोलणं झालं होतं. तिने सांगितलं की, लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. घरात नातेवाईक आले आहेत. लग्नाआधी अनेक कार्यक्रम करायचे आहेत. आता लग्नाच्या घाईत फोनवर बोलणं शक्य होणार नाही. गुरुवारी लग्नाची वरात घेऊन नवरदेव जेव्हा रहिमाबादला पोहोचला आणि त्याने काजलला फोन केला तेव्हा तो बंद आला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
अजब! 5 वर्षांचं रिलेशन; लग्नासाठी वरात घेऊन पोहोचला नवरदेव, सासरच झालेलं गायब, रात्रभर शोधलं अन्..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement