पुतण्याच्या लग्नात नाच नाच नाचला, ऋतिक रोशनवर आली काठी टेकवत चालायची वेळ; झालं काय? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ऋतिक रोशनचा पुतण्याच्या लग्नातील डान्स व्हिडीओ व्हायरल झाला, तर दुसऱ्या व्हिडीओत तो वॉकिंग स्टिकसह दिसला. ऋतिक रोशनला नेमकं झालं काय?
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा काही दिवसांआधी पुतण्याच्या लग्नात नाचत असतानाचा व्हिडीओ समोर आला. ऋतिकने त्याच्या दोन्ही मुलांबरोबर लग्नात धमाल डान्स केला. ऋतिकच्या डान्सची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून त्याचे चाहते चिंतते पडले आहेत.
काही दिवसांआधी पुतण्याच्या लग्नात त्याच्या स्टाइलनं मनसोक्त नाचणारा ऋतिक रोशन थेट काठी टेकवत टेकवत आला. ऋतिकला असं पाहून सगळेच शॉक झालेत. ऋतिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
विरल भयानीवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ऋतिक रोशन ब्लॅक हुडी, पँड आणि कॅपमध्ये दिसला. त्याच्या हातात वॉकिंग स्टिक होती. त्या स्टिकच्या मदतीनं तो एक एक पाऊल टाकत होता. ऋतिकला हातात स्टिक घेऊन चालताना पाहून त्याच्या आजूबाजूचे सगळेच शॉक झाले. ऋतिकला नेमकं झालं काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
advertisement
ऋतिक रोशन हा अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल यांच्या घरी असलेल्या एका पार्टीसाठी पोहोचला होता. तेव्हा त्याला हातात स्टीक पडकून चालताना स्पॉट झाला. ऋतिकने यावेळी पापाराझींपासून दूर राहणं पसंत केलं. याआधी देखील ऋतिकने त्याचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात तो कुबड्यांचा आधार घेऊन उभा होता. त्यावेळेसही ऋतिकच्या चाहत्यांनी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
advertisement
advertisement
काही दिवसांआधी कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांने ऋतिक रोशनच्या सेनोरीटा या हिट गाण्यावेळचा किस्सा सांगितला. हे गाणं शूट करताना ऋतिकला खूप त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या होत्या.
मिर्ची प्लसशी बोलताना बॉस्को याने सांगितलं की, जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमातील सेनोरीटा हे गाणं शूट करणं ऋतिक रोशनसाठी खूप आव्हानात्मक होतं. शारीरिकदृष्ट्या त्याला खूप त्रास होत होता. मात्र तरीही त्यांनी शूटिंग पूर्ण केलं. गाणं पाहताना कुठेही ऋतिकच्या त्रासाबद्दल कळलं नाही की ऋतिकने त्या त्रासात गाणं शूट केलं. दरम्यान ऋतिक रोशनला नेमकं काय झालं आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 8:24 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पुतण्याच्या लग्नात नाच नाच नाचला, ऋतिक रोशनवर आली काठी टेकवत चालायची वेळ; झालं काय? VIDEO










