TRENDING:

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ८ आमदारांना ५ कोटींची ऑफर, पाच जण अटकेत, कथित 'ऑपरेशन लोट्स'वरून राजकारण तापलं!

Last Updated:

Opraton Lotus: देशातील काही राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र, त्याआधीच कर्नाटकमध्ये धक्कादायक घडामोडी घडल्या. ओडिशामधील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बेंगळुरू: देशातील काही राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र, त्याआधीच कर्नाटकमध्ये धक्कादायक घडामोडी घडल्या. ओडिशामधील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसच्या ८ आमदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची लाच दिल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका हॉटेलमधून पाच जणांना अटक केली असून, कथित 'ऑपरेशन लोटस'च्या या प्रयत्नामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसच्या ८ आमदारांना ५ कोटींची ऑफर, पाच जण अटकेत, कथित 'ऑपरेशन लोट्स'वरून राजकारण तापलं!
काँग्रेसच्या ८ आमदारांना ५ कोटींची ऑफर, पाच जण अटकेत, कथित 'ऑपरेशन लोट्स'वरून राजकारण तापलं!
advertisement

नेमकी घटना काय?

आज १६ मार्च रोजी राज्यसभेसाठी ओडिशात मतदान होत आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी ओडिशातील काँग्रेसच्या १४ पैकी ८ आमदारांना बेंगळुरू येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आरोप केला की, चार ते पाच लोकांनी या हॉटेलमध्ये घुसून काँग्रेस आमदारांना ५ कोटी रुपयांची ऑफर दिली आणि क्रॉस व्होटिंगसाठी दबाव टाकला. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या.

advertisement

हॉटेलमध्ये काय सापडले?

कोरापुटचे खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी ओडिशाच्या राउरकेला येथील आहेत. त्यांच्याकडे कोरे चेक (Blank Checks) सापडले असून, चौकशीत त्यांनी भाजप समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांचे नाव घेतल्याचे समजते. ज्या हॉटेलमध्ये हे आमदार थांबले होते, ते हॉटेलदेखील दिलीप राय यांच्या मालकीचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

advertisement

राज्यसभेचे राजकीय समीकरण

ओडिशामध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून मनमोहन सामल आणि सुजीत कुमार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बिजू जनता दलाकडून संतृप्त मिश्रा आणि भाजपचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार दिलीप राय हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांकडून काँग्रेस-सीपीएमचा पाठिंबा असलेले दत्तेश्वर होता हे उमेदवार आहेत. चौथ्या जागेसाठी दोन अपक्षांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे. त्यासाठीच फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

advertisement

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक चवीची अस्सल भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी खा 3 प्रकार, किंमत 60 रुपये! Video
सर्व पहा

"भाजप धनशक्तीचा वापर करून लोकशाहीची हत्या करत आहे. आमच्या आमदारांना धमकावण्यात आले," असा आरोप ओडिशा काँग्रेस अध्यक्ष भक्त चरण दास यांनी केला. तर, भाजप प्रवक्ते अनिल बिस्वाल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसत असल्याने ते असे खोटे दावे करत आहेत," असे त्यांनी म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ८ आमदारांना ५ कोटींची ऑफर, पाच जण अटकेत, कथित 'ऑपरेशन लोट्स'वरून राजकारण तापलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल