TRENDING:

Fake News Alert : पाकिस्तानची पुन्हा नाचक्की, सुखोई पाडल्याच्या दाव्याची पोलखोल, हा घ्या पुरावा!

Last Updated:

भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवांचं मोठं फेक युध्द सुरू आहे. त्यातही पाकिस्तानच्या सोशल मीडिया हँडल्सकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवांचं मोठं फेक युध्द सुरू आहे. त्यातही पाकिस्तानच्या सोशल मीडिया हँडल्सकडून अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत की, भारतीय हवाई दलाचं सुखोई Su-30MKI विमान मुझफ्फराबादमध्ये पाडण्यात आलं आहे आणि एक भारतीय वैमानिक जिवंत पकडण्यात आला आहे.
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की, सुखोई पाडल्याच्या दाव्याची पोलखोल, हा घ्या पुरावा!
पाकिस्तानची पुन्हा नाचक्की, सुखोई पाडल्याच्या दाव्याची पोलखोल, हा घ्या पुरावा!
advertisement

केंद्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (PIB) या दाव्यांचं खंडन केलं असून, या सगळ्या बातम्या फेक न्यूज असल्याचं स्पष्ट केलं आहे. PIB ने आपल्या अधिकृत X (म्हणजेच ट्विटर) अकाउंटवरून ‘Fake News Alert’ देत या अफवांमागचं सत्य उघड केलं आहे.

फेक क्लिप, फेक दावा – सत्य काय?

सुखोई पाडलं? — असंच काहीही घडलं नाही. IAF नेही असा कुठलाही प्रकार घडल्याचं नाकारलं आहे.

advertisement

भारतीय पोस्ट उद्ध्वस्त?

पाकिस्तानकडून पसरवला गेलेला एक व्हिडिओ दाखवतो की भारतीय पोस्ट पाकिस्तानच्या रॉकेट हल्ल्यात उद्ध्वस्त झालाय. मात्र PIB च्या तपासणीनुसार, हा व्हिडिओ एक व्हिडिओ गेम – Arma 3 चा आहे, आणि तो मागील 3 वर्षांपासून इंटरनेटवर आहे.

जालंधरमधील शेतीत ड्रोन हल्ला?

एक व्हिडिओ पसरतोय, ज्यामध्ये पंजाबच्या जालंधरमधील शेतात ड्रोन हल्ला झाला असं सांगितलं जातंय. पण PIB नुसार, हा व्हिडिओ एका शेतातील साध्या आगीचा आहे आणि त्याचा हल्ल्याशी काहीही संबंध नाही.

advertisement

20 Raj Battalion चं अस्तित्वच नाही 

पाकिस्तानकडून पसरवण्यात आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला की “20 राज बटालियन” नामक भारतीय युनिटवर हल्ला झाला. मात्र PIB ने स्पष्ट केलंय की भारतीय लष्करात असं काही युनिट अस्तित्वातच नाही.

नागरिकांनी काय करावं?

PIB ने नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा संवेदनशील काळात सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही माहितीची शहानिशा न करता शेअर करू नये.

advertisement

फेक न्यूज केवळ अफवाच नाही, तर ती जनतेत भीती पसरवते, चुकीची धारणा तयार करते आणि युद्धजन्य परिस्थितीत गंभीर धोका निर्माण करू शकते.

मराठी बातम्या/देश/
Fake News Alert : पाकिस्तानची पुन्हा नाचक्की, सुखोई पाडल्याच्या दाव्याची पोलखोल, हा घ्या पुरावा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल