माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होळी खेळणाऱ्या लोकांवर अचानक हाय टेंशन वायर्सची वीज कशी पडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून इतर सहा जखमींमध्ये मुलांचाही समावेश आहे.
advertisement
वाचा - आधी जेलमध्ये पाठवलं, बाहेर आल्यावर लग्न, लॉजवर बोलावलं आणि गुप्तांगच कापलं!
धुलीवंदनाच्या दिवशी मुंबईत मोठा अपघात
धुलीवंदनाच्या दिवशी माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्र किनाऱ्यावर आलेले पाच जण बुडाले आहेत, यातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. बुडालेल्या युवकाचं नाव यश कागडा असं आहे. यशचा शोध सुरू आहे. बुडालेले सगळे जण महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत. वाचवण्यात आलेल्या चार जणांपैकी दोन जण सुखरूप घरी गेले आहेत, तर दोघांवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेला हर्ष किंजले नावाच्या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर हे पाच युवक नेमके कसे बुडाले याचा शोध घेतला जात आहे.