जिनेव्हामध्ये उतरण्यापूर्वीच फ्रेंच आल्प्सच्या 'माँट ब्लाँक' पर्वत रांगेत हे विमान आदळलं. 4677 मीटर उंचीवर झालेल्या या भीषण अपघातात 106 प्रवासी आणि 11 कर्मचारी अशा एकूण 117 जणांचा मृत्यू झाला. पण भारताने केवळ 117 जीव गमावले नव्हते, तर आपला सर्वात मोठा शास्त्रज्ञ, अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार आणि 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'चे (TIFR) संस्थापक होमी जहांगीर भाभा यांना गमावलं होतं.
advertisement
दोन आठवड्यात भारताने दोन हिरे गमावले
डॉ. भाभा यांच्या मृत्यूने अवघ्या 56 व्या वर्षी त्यांच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या घटनेला 'देशासाठी भीषण धक्का' असं संबोधलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे, भाभांच्या मृतदेहाच्या दोन आठवडे आधीच लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंदमध्ये रहस्यमयी मृत्यू झाला होता. दोन आठवड्यांत दोन महान व्यक्तींना गमावणं हा भारतासाठी अत्यंत वेदनादायी योगायोग होता.
18 महिन्यांत अणुबॉम्बचं स्वप्न
30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईत जन्मलेल्या भाभांनी केंब्रिजमधून शिक्षण घेऊन कॉस्मिक रेजवर जागतिक दर्जाचं संशोधन केलं होतं. 1948 मध्ये नेहरूंनी त्यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनवलं. भाभांचं स्पष्ट मत होतं की, अणुऊर्जा केवळ वीज निर्मितीसाठी नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी गरजेची आहे. 1965 मध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की, "जर सरकारने परवानगी दिली, तर भारत अवघ्या 18 महिन्यांत अणुबॉम्ब बनवून दाखवेल." पण दुर्दैवाने या विधानानंतर अवघ्या तीन महिन्यांतच त्यांचं विमान कोसळलं.
अपघात की सीआयएचा (CIA) कट?
फ्रेंच तपास अहवालाने हा अपघात 'पायलटची चूक' असल्याचं सांगितलं. मात्र, या विमानाचा ढिगारा क्रॅश साइटपासून अनेक मैल दूर विखुरलेला होता, जे संशयास्पद होतं. 2008 मध्ये 'Conversations with the Crow' नावाच्या पुस्तकाने खळबळ उडवून दिली. या पुस्तकात दावा करण्यात आला की, अमेरिकेच्या सीआयएने (CIA) या विमानात बॉम्ब ठेवला होता. माजी सीआयए अधिकारी रॉबर्ट क्राउली यांच्या हवाल्याने असं म्हटलं गेलं की, भारताच्या वाढत्या अणुशक्तीला रोखण्यासाठी हे कटकारस्थान रचलं गेलं होतं.
होमी जहांगीर भाभा जरी आपल्याला सोडून गेले असले, तरी त्यांनी पाहिलेलं स्वप्न संपलं नाही. 1974 मध्ये पोखरणमध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली, तेव्हा त्या प्रत्येक अणुभट्टीत आणि शास्त्रज्ञाच्या जिद्दीत भाभांच्या विचारांची सावली होती. आजची BARC आणि TIFR सारखी केंद्रं त्यांच्या वैज्ञानिक ताकदीची साक्ष देत आहेत. 24 जानेवारी 1966 चा तो दिवस भारताच्या इतिहासात नेहमीच एक रहस्य आणि दुःखद आठवण म्हणून राहील. जर ते विमान माँट ब्लाँकच्या शिखरावरून सुखरूप पार झालं असतं, तर कदाचित आज भारताचं वैज्ञानिक भविष्य अजून वेगळं असतं.
