व्यापाऱ्याचं नाव अजय दुबे असून त्यांनी तात्काळ आपल्या कुटुंबाला सागरहून भोपालला बोलावलं. कुटुंबीयांच्या सल्ल्याने त्यांनी मुंबईत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. परंतु मुंबईतील सुराणा हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा तपासणी केल्यावर खरी परिस्थिती समोर आली.
तेहरानकडून 'कच्चा' माल तयार, संपूर्ण जगभरात खळबळ; इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका
मुंबईत समोर आलं सत्य
मुंबईत कार्डिएक तज्ज्ञ डॉ. रमेश कावर यांनी 14 एप्रिल रोजी पारंपरिक इनोवेटिव्ह एंजियोग्राफी केली. या तपासणीत केवळ एका धमन्यात 40% ब्लॉकेज आढळले. जे 60 व्या वर्षी सामान्य मानले जाते. शस्त्रक्रियेची कोणतीही गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. यावरून अजय दुबे यांचा संताप अनावर झाला.
advertisement
एक कोटींच्या नुकसानभरपाई
या प्रकरणामुळे आपल्याला मानसिक त्रास, व्यावसायिक नुकसान आणि चुकीच्या निदानामुळे परदेश दौरा रद्द करावा लागल्याचं सांगत अजय दुबे यांनी आपले वकील ऋषी मिश्रा यांच्यामार्फत हॉस्पिटलला एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 15 दिवसांत उत्तर न दिल्यास कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
रुग्णालयाकडून उत्तर
या प्रकरणावर सागर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. आदित्य अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आत्तापर्यंत आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यावरच दावा काय आहे ते पाहू. आमच्याकडे वापरण्यात येणाऱ्या तपासणीच्या सर्व यंत्रणा अत्याधुनिक आहेत. अशा प्रकारच्या चुका होण्याची शक्यता नाही.