अल्मोडा : सध्या बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. बारावी झाल्यावर नेमके कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, असे अनेकांना वाटते. अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात. अनेकांना याबाबत कसा निर्णय घ्यावा, हे कळत नाही. करिअरबाबत निवड करताना मनात भीती असते. त्यामुळे जर बारावीमध्ये सायन्स घेतले असेल आणि तुम्हाला पुढे चांगले करिअर करायचे असेल, तर लोकल18 च्या टीमने तुमच्यासाठी याबाबत विशेष आढावा घेतला.
advertisement
बारावीमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला हे मुलांचे विषय असतात. विज्ञान शाखेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात. सर्वप्रथम वैद्यकीय आणि अभियांत्रिकी व्यतिरिक्त कृषी अभ्यासक्रम, फलोत्पादन अभ्यासक्रम, पशुवैद्यकीय व जैवतंत्रज्ञान यासोबतच अॅडव्हान्स संगणक कोर्स विद्यार्थी करू शकतात. या संदर्भात लोकल18 च्या टीमने सोबन सिंग जीना विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रवीण सिंग बिश्त यांच्याशी विशेष संवाद साधला.
लोकल18 बोलताना प्राध्यापक प्रवीण सिंह बिष्ट यांनी सांगितले की, बारावीनंतर विद्यार्थ्यांचे करिअर सुरू होते. ही वेळ खूप महत्त्वाची असते. त्यामुळे सध्या ट्रेडिशनल कोर्समध्ये विद्यार्थ्यांची आवड कमी झाल्याचे दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बारावी सायन्स केले आहे, ज्यामध्ये गणित किंवा जीवशास्त्र हे विषय होते, त्यांच्यासाठी बेस्ट करिअर ऑप्शन आहेत.
नापीक जमीन बनवली मौल्यवान, या एका योजनेनं बदललं शेतकऱ्याचं आयुष्य! आज वर्षाला कमावतोय लाखो रुपये
हे विद्यार्थी मेडिकल किंवा इंजीनिअरींग क्षेत्रात करिअर करू शकतात. यामध्ये ते आपले भविष्य घडवू शकतात. याशिवाय सध्या कॉम्प्युटरचा जमाना आहे. मुले कॉम्प्युटरचे अॅडव्हान्स कोर्सही करू शकतात.
बीएस्सी मध्येही अनेक पर्याय -
प्रवीण बिष्ट यांनी पुढे बोलताना सांगितले की, जर विद्यार्थ्याने बारावीनंतर बीएस्सी केले तर तो कृषी, पशुवैद्यकीय, वनशास्त्र, फलोत्पादन आणि संगणकाचे अॅडव्हान्स कोर्स करू शकतो. याशिवाय भारत सरकारच्या विविध योजनांतर्गत मुलांच्या कौशल्य विकासासाठी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम चालवले जात आहेत. बायो ग्रुप असलेले विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात जाऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.