लियाकत रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याने बिर्याणीची ऑर्डर दिली होती. जेव्हा बिर्याणी वाढण्यात आली तेव्हा रायता नसल्याचं दिसलं. स्टाफकडे रायता मागितला असता तो देण्यास नकार दिला गेला. ग्राहक पुन्हा पुन्हा रायता मागत राहिला. यामुळे रेस्टॉरंट स्टाफ आणि मालक यांच्यासोबत ग्राहकाचा वादही झाला.
Naresh Goyal : मला न्याय द्या, सुनावणी आटोपताच नरेश गोयल गेले न्यायाधीशांकडे; डोळ्यात आलं पाणी
advertisement
रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला एका खोलीत नेलं आणि खोली आतून बंद करत मारहाण केली. या गोंधळात कुणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी ग्राहकाला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकऱणी पोलिसांनी तपास सुरू केला असून रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासत आहेत.
ग्राहकाला मारहाणीची घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाली. या रेस्टॉरंटमध्ये ही घडलेली पहिलीच घटना नाहीय. स्थानिकांनी सांगितले की, इथे अनेकदा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. हॉटेल स्टाफकडून सातत्याने अशी अरेरावी केली जाते.
