Naresh Goyal : मला न्याय द्या, सुनावणी आटोपताच नरेश गोयल गेले न्यायाधीशांकडे; डोळ्यात आलं पाणी

Last Updated:

सुनावणी आटोपल्यानंतर आरोपीच्या पिंजऱ्यातून नरेश गोयल न्यायाधीश बेंचसमोर आले. गोयल यांचे वकील आबाद पोंडा यांनी, गोयल यांना बोलायचंय, अशी विनंती केली.

News18
News18
प्रशांत बाग, मुंबई, 11 सप्टेंबर : जेट एअरवेजचे संस्थापक चेअरमन नरेश गोयल यांना ईडीने आज मुंबई सत्र न्यायालयात केलं. ईडीने गोयल यांना 538 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. कर्जाच्या रकमेचा दुरुपयोग केल्याचा ठपका गोयल यांच्यावर आहे. CBIनं याप्रकरणी दाखल केलेल्या FIR वर आधारित ईडीचा ECIR आहे. आज गोयल यांची ईडी कोठडी संपत असल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सत्र न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या कोर्टासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. नरेश गोयल यांच्या रिमांडवर सुनावणी आटोपली असून  न्यायाधीश एम जी देशपांडे 5 वाजता  निर्णय देणार आहेत. दरम्यान, सुनावणी आटोपताच नरेश गोयल हे न्यायाधीशांच्या बेंचसमोर आले. यावेळी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात माझ्यावर उपचार करावेत अशी विनंती केली. यावेळी नरेश गोयल यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
सुनावणी आटोपल्यानंतर आरोपीच्या पिंजऱ्यातून नरेश गोयल न्यायाधीश बेंचसमोर आले. गोयल यांचे वकील आबाद पोंडा यांनी, गोयल यांना बोलायचंय, अशी विनंती केली. न्यायाधीश देशपांडे यांनी गोयल यांना बोलण्याची परवानगी दिली. त्यानंतर नरेश गोयल म्हणाले की, मला अनेक मेडिकल आजार, माझी बायपास झाली आहे, मला मणक्याचा आजार, माझे गुडघे व्यवस्थित नाही, मला योग्य मेडिकेशन हवं, ब्रिच कॅण्डी हॉस्पिटल मध्ये माझी तपासणी करा. मला न्याय द्या असं म्हणताच नरेश गोयल यांच्या डोळ्यात पाणी आले.
advertisement
न्यायाधीश - तुम्हाला या 11 दिवस रिमांड मध्ये, काही त्रास झाला का ? ईडीनं सहकार्य केलं नाही का ?
सुनील गोंसालवीस - आज सकाळीच नरेश गोयल यांच्या सर्व तपासणी केल्या आहे. (मेडिकल रिपोर्ट केले सादर). यात कोणताही नवा त्रास नाही असं स्पष्ट लिहिलंय. आम्हाला मर्यादा आहे, त्यांना सरकारी रुग्णालयातच नेऊ शकतो.
advertisement
न्यायाधीश गोयल यांना - तुम्हाला मेडिसिन देत नाही का ? तुम्हाला जमिनीवर झोपवतात का ?
गोयल - मला बेड आहे, औषधं घेऊ देतात पण,मी कोणतीही फेवर मागत नाही, मला घरचं अन्न मिळावं, मला योग्य बेड मिळावा, माझ्या पत्नीसोबत भेटता यावं, माझं वय खूप झालंय, मी खूप भोगलंय, मी तपासात सहकार्य करतोय.
advertisement
न्यायाधीश ईडीला - त्यांना तुम्ही घरचं अन्न आणी हवा तो बेड का देत नाही ? इतके मेडिकल प्रॉब्लेम आहे तर तो तो त्यांचा अधिकार आहे
नरेश गोयल - माझी ब्रिच कॅण्डी हॉस्पिटल मध्ये तपासणी करावी
गोंसालवीस - तपास एजन्सी म्हणून आम्हाला मर्यादा
आबाद पोंडा - त्यांच्या नियमित डॉक्टरांकडून तपासणी करण्याची परवानगी दया
advertisement
न्यायाधीश to ED - काय हरकत आहे ? त्यांच्या नियमित डॉक्टरांकडून तपासणी करायला ? घरचं अन्न, मॅट्रेस द्यायला ? त्यांच्या पत्नी सोबत काही वेळ देता येणार नाही का ?
गोंसालवीस - मला काही मर्यादा आहे, त्यांना अर्ज करू दया, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उत्तर देतो. अन्न आणि मॅट्रेसला काही हरकत नाही. डॉक्टर्स येऊन तपासणी करू शकतात का हे स्पष्ट करतो. पत्नी अनिता सोबत व्हीडिओ कॉलनं ते बोलू शकतील.
advertisement
गोयल - माझ्या आजूबाजूला कायम कोणी ना कोणी असतं, पत्नीशी बोलतांना तेव्हढी सूट मिळावी
न्यायाधीश - ते तसं करू शकत नाही. तुमच्यात जर काही इतर बोलणं झालं तर ? ते जबाबदार असतील. तुमचं वय आणि आजार पाहून तुम्हाला सहकार्य करायच्या सूचना मी देतो.
न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवला आहे. मात्र न्यायाधीश ईडीला रिमांड देण्याची शक्यता आहे. ईडीकडून सुनील गोंसालवीस, कविता पाटील यांनी बाजू मांडली. तर गोयल यांच्याकडून वकिलांची फौज होती.  अमित देसाई यांचा आक्रमक आणि आग्रही युक्तिवाद करण्यात आला. नरेश गोयल, अनिता गोयल, नम्रता गोयल हे जेट परिवाराचे अधिकृत सदस्य आहेत. त्यांच्या बँक खात्यात फक्त कर्ज रकमाच आल्या नाही. बँकेतून खर्च झाला असला तरी तो त्याच रकमेतून, ही ईडीची अत्यंत चुकीची भूमिका आहे. नरेश गोयल यांच्याविरोधातील हा गुन्हा फक्त, इंटेंशन या एकाच शब्दाभोवती फिरतोय. व्यवहारांचं चुकीचं इंटरप्रीटेशन केलं जातंय अशी भूमिका गोयल यांच्यावतीने मांडण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Naresh Goyal : मला न्याय द्या, सुनावणी आटोपताच नरेश गोयल गेले न्यायाधीशांकडे; डोळ्यात आलं पाणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement