TRENDING:

IND vs PAK : 'विश्वासात घेतलं नाही...', ट्रम्प यांच्या घोषणेवर भारताची नाराजी, 4 दिवसांच्या चर्चांची Inside Story

Last Updated:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढल्यानंतर शनिवारी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानने शस्त्रसंधी केल्याची घोषणा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
'विश्वासात घेतलं नाही...', ट्रम्प यांच्या घोषणेवर भारताची नाराजी, 4 दिवसांच्या चर्चांची Inside Story
'विश्वासात घेतलं नाही...', ट्रम्प यांच्या घोषणेवर भारताची नाराजी, 4 दिवसांच्या चर्चांची Inside Story
advertisement

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढल्यानंतर शनिवारी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानने शस्त्रसंधी केल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची घोषणा केल्यामुळे भारतात विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

advertisement

ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आता भारताकडूनही या संपूर्ण प्रकरणाबद्दलची भूमिका मांडण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींचा स्पष्ट संदेश होता की जर तिकडून गोळी झाडली तर इथूनही गोळी झाडली जाईल. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ते अजून सुरू आहे, असं सरकारच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

अमेरिकेची भूमिका नाही

शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेची भूमिका नसल्याचंही सरकारने सांगितलं आहे. 10 तारखेला दुपारी 1 वाजता पाकिस्तानचा आम्हाला फोन आला, पण डीजीएमओ बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही 3.35 वाजता उत्तर दिले. घोषणा करण्यापूर्वी ट्रम्पने भारताला विश्वासात घेतलं नाही. पाकिस्तानशी सामंजस्य साधण्याबद्दल भारताने ट्रम्पला सांगितले नाही, असं म्हणत भारताने अमेरिकेच्या भूमिकेबाबतही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement

9 मे रोजी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्यासोबत बोलले. पाकिस्तान असं वागत असेल तर त्यांना जोरदार प्रतिसाद मिळेल आणि तो प्रतिसाद विनाशकारी असेल, असं पंतप्रधान मोदींनी व्हॅन्स यांच्यासोबतच्या चर्चेत सांगितलं. 10 तारखेला भारताने त्यांच्या हवाई तळांवर खूप कठोरपणे हल्ले केले. यानंतर पाकिस्तानचा सूर बदलला, आणि पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनिर अमेरिकेचे गृहसचिव मार्को रुबियो यांच्यासोबत बोलला.

advertisement

मार्को रुबियो यांनी मुनिरला पाकिस्तान गोळीबार थांबवायला तयार आहे का? असं विचारलं. तेव्हा त्यांनी गोळीबार केला नाही तर आम्ही गोळीबार करणार नाही, असं मुनिरने रुबियो यांना सांगितलं, असं भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर दुपारी 1 वाजता पाकिस्तानमधून आम्हाला पहिल्यांदा फोन आला, पण डीजीएमओ बैठकीत होते, म्हणून आम्ही त्यांना 3.35 मिनिटांनी उत्तर दिलं. आमच्याकडे डीजीएमओ यंत्रणा आहे, तेच बोलण्यासाठी योग्य आहेत. जोपर्यंत परिस्थिती स्थिरावण्याबाबत ते काहीही बोलत नाहीत, तोपर्यंत राजकीय चर्चा होणार नाही, असंही भारताने स्पष्ट केलं आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी जागतिक नेत्यांना आम्ही हल्ला करू असं सांगितल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

advertisement

काश्मीरमध्ये तिसऱ्याचा हस्तक्षेप नाही

तसंच काश्मीर प्रश्नावर फक्त एकच मुद्दा आहे, जो पीओके भारताला सोपवायचा आहे, यात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नाही. अणूउर्जेवर कोणतीही चर्चा झाली नाही, असं भारताने ठणकावून सांगितलं आहे.

मराठी बातम्या/देश/
IND vs PAK : 'विश्वासात घेतलं नाही...', ट्रम्प यांच्या घोषणेवर भारताची नाराजी, 4 दिवसांच्या चर्चांची Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल