ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतानं केलेल्या जोरदार कारवाईनंतर पाकिस्तान पुरता बिथरलाय. गुरुवारी रात्री पाककडून नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर आणि शहरांवर स्वार्म ड्रोन्सनं हल्ले करण्यात आले.पाकिस्ताने भारताच्या उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा, राजौरी आणि पठाणकोट या भागांना ड्रोनद्वारे लक्ष्य़ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सर्व हल्ले परतावून लावलेत. भारताच्या एस -400 या डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्रं आणि ड्रोन पाडले. याशिवाय, एल 70 गन, Zu-23mm,शिल्का, आकाश, पिचोरा, आणि एमआरएसएम या यंत्रणेनंही पाकिस्तानचे रॉकेट हल्ले परतावून लावले. या कामगिरीत सर्वात अव्वल स्थानी आहे ते भारताचं सुदर्शन चक्र म्हणजेच एस 400..
advertisement
भारताचं सुदर्शन चक्र, S-400 ची वैशिष्ट्ये
S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते. ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे. भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे. अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही पाडण्याची याची क्षमता आहे. S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते. ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर, मानवरहीत विमान आणि ड्रोन्सना नष्ट करते. 400 किलोमीटर अंतरावरुनच ही सिस्टिम टार्गेट्चा अचूक वेध घेते.
भारताच्या या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीनं गुरुवारी रात्री आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानकडून होणारे मिसाइल आणि ड्रोन हल्ले यशस्वीरित्या परतवून लावण्यात आले. ड्रोनचा मारेकरी अशी ओळख असलेल्या एल 70 गननंही गुरुवारी आपली ताकद दाखवून दिली. एल-70 ही स्वीडिश-निर्मित 40 मिमी विमानविरोधी तोफ आहे जी भारतानं अपग्रेड केलीय.ही विमानविरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षण प्रणालीचा भाग आहे. त्याची मारक क्षमता 4 किलोमीटरपर्यंत आहे.
ही तोफ कोणत्याही ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना सहजपणे लक्ष्य करू शकते. हे रडार-आधारित प्रणालीनं सुसज्ज आहे. ज्यानं पंजाब आणि जम्मू- काश्मीरच्या अनेक भागात हवेत असतानात अचूकतेनं पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले.याशिवाय शिल्का या सोव्हिएत बनावटीच्या स्वयंचलित विमानविरोधी तोफ आहेत.ज्यात 23 मिमी च्या 4 तोफा आहेत...या विमानविरोधी तोफेची रेंज 2.5 किलोमीटरपर्यंत आहे आणि ती हेलिकॉप्टर, ड्रोन आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना लक्ष्य करू शकते. ही बंदूक प्रति मिनिट 4000 राउंड फायर करण्यास सक्षम आहे. जे एका चिलखती वाहनावर तैनात केले जाते. उधमपूर आणि राजस्थानच्या इतर भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात शिल्कानं महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताची आणखी एक मोठी ताकद म्हणजे Zu-23-2 ही सोव्हिएत बनावटीची 23 मिमी स्वयंचलित विमानविरोधी तोफ आहे. याची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापरली जाते.त्याची मारा क्षमता 2.5 किमी पर्यंत आहे.जे ऑप्टिकल साईट आणि रडार-आधारित ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहे. या विमानविरोधी तोफेने उधमपूर आणि जम्मू आणि काश्मीरच्या इतर अनेक भागात हवेत कमी उंचीवर उडणारे पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले.
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिममधील आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही पूर्णपणे मेड इन इंडिया प्रणाली आहे.मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली डीआरडीओने डिझाईन केली आहे. ज्याची रेंज 25 ते 30 किमी आहे.ही रडार-आधारित कमांड मार्गदर्शनाखाली शत्रूच्या लक्ष्यांवर 90 टक्क्यांहून अधिक अचूकतेनं हल्ला करते. जम्मू आणि काश्मीरमधील हल्ल्यात आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानी जेएफ-17 विमान पाडल्याचं सांगण्यात येतंय.याशिवाय MRSAM ही मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणालीही पाकिस्तानचा हल्ला परतवून लावण्यास यशस्वी ठरलीय.
हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली भारत आणि इस्रायलनं संयुक्तपणे विकसित केलीय.हे बराक-8 चा एक भाग आहे आणि भारताच्या तिन्ही सैन्यात तैनात आहे. त्याची मारा क्षमता 70 ते 100 किमी आहे.हे लढाऊ विमाने, ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना सहजपणे लक्ष्य करू शकते. ही हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय रडार होमिंग आणि मल्टी-फंक्शन रडारने सुसज्ज आहे. या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्तर आणि पश्चिम भारतात पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात भूमिका बजावलीOUT ड्रोन हल्ल्यांना हवेतच बेचिराख करणाऱ्या या भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमनं पाकिस्तानला चांगलंच बेजार करुन सोडलं.कवचकुंडलांच्या या कामगिरीमुळे भारताची संरक्षणव्यवस्था किती मजबूत आहे.याचा प्रत्यय फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला आलाय.