बांका : सध्या सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी उमेदवार आपला अर्ज भरत आहेत. अर्ज भरताना उमेदवाराला आपल्या संपत्तीचीही माहिती द्यावी लागते. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहेत. उमेदवारांच्या संपत्तीबाबत मतदारांनाही उत्सुकता असते. त्यातच आता इंडिया आघाडीच्या एका उमेदवाराच्या संपत्तीबाबत समोर आलेल्या माहितीमुळे तुम्हालाही धक्का बसेल.
advertisement
सध्या उत्तरप्रदेशातील बांका लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. याठिकाणी मैदानात इंडिया आघाडीतर्फे जयप्रकाश नारायण यादव आणि एनडीएच्या वतीने गिरधारी यादव हे उतरले आहे. या दोघांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे.
Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीच्या उपवासाने मिळते मुक्ती; सर्व दु:ख, कष्टही होतात दूर
याठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार जयप्रकाश नारायण यादव यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यांनी पाटणा येथून एमए आणि एलएलबीची डिग्रीही घेतली आहे. त्यांचे वय 70 वर्षे आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या पत्नी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. तर रोख रक्कम म्हणून त्यांच्याजवळ 95 हजार आणि त्यांच्या पत्नीजवळ 75 हजार रुपये आहेत.
इंडिया आघाडीचे उमेदवार जयप्रकाश नारायण यादव
उमेदवारापेक्षा पत्नी जास्त श्रीमंत -
जयप्रकाश नारायण यादव यांच्या बँक खात्यात 9 लाख 22 हजार 555 रुपये आणि पत्नीच्या बँक खात्यात 22 लाख 11 हजार 104 रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे दोन चार चाकी वाहनेही आहेत. या वाहनांची किंमत 12.50 लाख आहे. तसेच त्यांच्याजळव 8 लाख 47 हजार 675 रुपयांचे दागिने आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे त्यांचे 65 लाख 42 हजार 29 रुपयांचे दागिने आहेत. सोबतच पत्नीच्या नावावर 9 लाख 50 हजार 456 रुपयांचे दोन शेअरही आहेत.
#किस्से राजकारणाचे : मराठी खासदाराने घेतली हिंदीची बाजू, नेहरुंनी कापलं तिकिट, नेमकं काय घडलं होतं?
जयप्रकाश नारायण यादव यांच्या नावावर 3 कोटी 81 लाख 56 हजार 750 रूपयांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर 15 लाख 50 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. जयप्रकाश नारायाण यादव यांच्या नावावर 5 कोटी 31 लाख 56 हजार 750 रुपये आणि पत्नीच्या नावावर 1 कोटी 20 लाख 50 हजार 690 रुपयांचे किंमतीचे पाटणा, गाझियाबाद आणि गुडगाव येथे घर आणि अपार्टमेंट आहे. तर बँकांचे 1 लाख 11 हजार 200 रुपयांचे कर्जही थकीत आहे.
संपत्तीमध्ये वाढ -
जयप्रकाश नारायण यादव यांच्या मालमत्तेत सुमारे 86 लाख रुपयांची वाढ झाली आहे. तर कर्जातही वाढ झाली आहे. 2019 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 6.87 कोटी होती. तर 2024 मध्ये ती वाढून जवळपास 7.73 कोटी रुपये इतकी झाली आहे.
जय प्रकाश नारायण यादव यांच्याजवळ 125 ग्रॅमचे दागिने आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 963 ग्रॅम दागिने आहे. सोबतच 3 कोटी 97 लाख रुपयांची जमीनही आहे. दरम्यान, इंडिया आघाडी आणि एनडीएच्या या दोन्ही उमेदवारांचे भविष्य येत्या 26 एप्रिलला ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.