पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा स्विकारला असून पाकिस्तानच्या लष्करी चौक्या आणि दहशतवादी लाँचपॅडवर हल्ला केला. भारताने ही दोन्ही ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. ही दोन्ही ठिकाणं भारतावर ड्रोन हल्ला करण्यासाठी वापरली जात होती. त्यामुळे भारताने थेट पाकिस्तानच्या मुळावर घाव घातला आहे.
अलीकडेच या लाँच पॅडमधून मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. भारताच्या उत्तरेकडील लेहपासून दक्षिणेकडील सर क्रीकपर्यंत २६ ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले. या हल्ल्याचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
पाकिस्तानने रात्रभर सीमेपलीकडून गोळीबार सुरू ठेवला. कुपवाडामध्ये ब्लॅकआऊट लागू करण्यात आला होता. या गोळीबारात जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरावर गोळीबार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी पुष्टी काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली.