निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियांका गाधी या चार लाख मतांनी आघाडीवर आहेत. दुपारी अडीच वाजेपर्यंत प्रियांका गांधींना सहा लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला २ लाख १० हजार मते मिळाली आहेत.
वायनाडमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपच्या नव्या हरिदास यांना १ लाख ९ हजार मते मिळाली आहेत. प्रियांका गांधींनी आघाडीनंतर इंडियन मुस्लिम लीग आणि तेलंगनाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांनी सांगितलं की, या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना मिळालेल्या मताधिक्क्यापेक्षा जास्त मते मिळतील आणि विक्रमी विजय मिळवतील.
advertisement
राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठी इथून निवडणूक लढवली होती. अमेठीत त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हा वायनाडमध्ये राहुल गांधींचा विजय झाला होता. त्यांनी ४ लाख ३१ हजार मतांनी विजय मिळवला होता. तर २०२४ मध्ये लोकसभेत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाडमध्ये जिंकले होते. या दोन्ही जागी जिंकल्यानंतर वायनाडची जागा सोडली होती. वायनाडमध्ये त्यांची आघाडी ३ लाख ६४ हजार इतकी होती.
