नोकरीच आमिष दाखवून केला अत्याचार
सुलतानगंज पोलीस स्टेशन परिसरातील एक तरुणी नोकरीच्या शोधात होती. दरम्यान, तिने इंस्टाग्रामद्वारे काझीपूर येथील रहिवासी राजवीरशी संपर्क साधला. त्यांच्या संभाषणादरम्यान, पीडितेने आरोपीला तिच्या नोकरीबद्दल सांगितले. राजवीरने तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. राजवीरला जसे समजले की पीडित नोकरीच्या शोधात आहे आणि सध्या तिच्याकडे कोणतंच काम नाही. हे समजताच आरोपीने डाव साधला आणि तिचा फायदा घेण्याचं ठरवलं. २१ ऑक्टोबर रोजी, आरोपीने तरुणीला काझीपूर नया टोला येथील त्याच्या भाड्याच्या खोलीत नेले आणि त्याचा डाव साधला.
advertisement
पीडितेची पोलिसांकडे तक्रार
नोकरीची गरज असल्याने पीडित भेटण्यास तयार झाली पण ती त्याच्या वासनेचा शिकार ठरली. आरोपीने नोकरी देतो सांगून बोलावलं आणि पीडितेवर जबरदस्ती केली. त्याने त्याच्या भाड्याच्या खोलीत तिला बोलावलं आणि तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं. पीडितेने शुक्रवारी कदमकुआन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील आरोपींना अटक केली. नोकरीच्या नावाखाली आरोपीने इतरांसोबतही गैरकृत्य केले आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत.
