फतेहाबाद, 31 जुलै : तज्ज्ञ सांगतात, सर्वच साप विषारी नसतात, काही साधे सापदेखील असतात. मात्र कितीही साधा असला, तरी सापाला पाहून भल्याभल्यांचे हातपाय थरथर कापतात. अनेकजणांना साप दूर असला तरी नुसत्या भीतीनेच सर्पदंश होतो. परंतु अशा सर्व लोकांच्या मदतीला सर्पमित्र धावून येतात आणि सापांना पकडून सुखरूपपणे सुरक्षितस्थळी सोडतात. हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील एका तरुणाला तर चक्क साप पकडायला प्रचंड आवडतं. त्याला साप पकडण्याची इतकी आवड आहे की, 9 वेळा सर्पदंश होऊनही त्याने हा छंद सोडलेला नाही. पवन जोगपाल असं त्याचं नाव.
advertisement
पवनने साप पकडण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं असून आतापर्यंत नागासारखे अनेक विषारी साप पकडले आहेत. त्याला सापाला हात लावायला जराही भीती वाटत नाही. मात्र तरीही त्याला 9 वेळा वेगवेगळे साप चावले आहेत. तो म्हणतो, 'सर्वच साप विषारी नसतात, काही काही तर सहज हातात येतात. साप खरंतर खूप लाजाळू जीव आहे. तो माणसांसमोर यायला घाबरतो आणि या भीतीपोटीच हल्ला चढवतो. त्यामुळे आपण उलटून त्याला मारण्यापेक्षा पकडून सुरक्षितस्थळी सोडणं कधीही चांगलं.' त्याचबरोबर त्याने 'साप चावल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा',असा सल्लादेखील सर्वसामान्यांना दिला आहे.
20 वर्षांपासून सापांना पकडणारा स्वतः झाला सापाचा शिकार, सर्पदंशामुळे मृत्यू
विशेष म्हणजे पवन साप पकडण्याचे अजिबात पैसे घेत नाही. तो अगदी निस्वार्थी भावनेने लोकांना सापांपासून आणि सापांना लोकांपासून वाचवतो. सुरुवातीला त्याने आवडीतून साप पकडण्यास सुरुवात केली होती. मात्र आता त्याचं सर्पमित्रांचं एक पथकच आहे.
चाकू घेऊन आलेल्या चोराला, महिलेने शिकवला चांगलाच धडा, पहा नेमकं काय घडलं?
फतेहबादमध्ये आलेल्या पुरात मदतीसाठी पवनदेखील पुढे सरसावला आहे. त्याने मागच्या चार दिवसांत तब्बल 152 सापांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. यामध्ये अधिकतर कॉमन सॅण्ड बोआ प्रजातीचे साप आहेत, जे जास्त काळ पाण्यात राहू शकत नाहीत. दरम्यान, पवनच्या या धाडसी स्वभावाचं सर्वत्र कौतुक होत आहे.