20 वर्षांपासून सापांना पकडणारा स्वतः झाला सापाचा शिकार, सर्पदंशामुळे मृत्यू

Last Updated:

अनेक विषारी सापांना पकडण्याची कला अवगत असणारा रामबली याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला.

20 वर्षांपासून सापांना पकडणारा स्वतः झाला सापाचा शिकार, सर्पदंशामुळे मृत्यू
20 वर्षांपासून सापांना पकडणारा स्वतः झाला सापाचा शिकार, सर्पदंशामुळे मृत्यू
शाहजहांपुर, 30 जुलै : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये 20 वर्ष सापांपासून अनेक रहिवाशांचे प्राण वाचवणारा सर्पप्रेमी रामबली स्वतःच सापाचा बळी ठरला. अनेक विषारी सापांना पकडण्याची कला अवगत असणारा रामबली याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. रामबली जमिनीवर पडलेल्या सापाला पेटीत बंद करत होता. त्याचेवेळी सापाने त्याच्या बोटाला चावा घेतला. वनौषधी उपचारानंतर रामबलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. रामबलीच्या मृत्यूमुळे स्थानिक लोक दुःखी झाले असून ते आता स्थानिक नागरिकांना सर्पदंश झाल्यास रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देत आहेत.
हरदोई जिल्ह्यातील रहिवासी असलेला सर्पमित्र रामबली हा गेल्या 20 वर्षांपासून लालपुल मोक्षधाममध्ये राहून शाहजहांपूरच्या रहिवाशांची सेवा करत होता. शहरात कोणाच्या घरी साप दिसला तर रामबलीला बोलावले जायचे. काही मिनिटांत सापांना पकडून तो जंगलात सोडून द्यायचा. परंतु त्याच रामबलीचा सर्प दंशामुळे मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामबलीने सर्पदंश झाल्यावर वनौषधी उपचार घेतले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि मग त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तो पर्यंत सापाचे विष त्याच्या संपूर्ण शरीरात भिनल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/देश/
20 वर्षांपासून सापांना पकडणारा स्वतः झाला सापाचा शिकार, सर्पदंशामुळे मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement