advertisement

सावधान! जुनी वाहनं घेताय? सरकारी कार्यालयाचे बनावट शिक्के अन् कागदपत्रं दाखवून होतोय खेळ, पुण्यात 51 लाखांची फसवणूक

Last Updated:

बस विक्रीच्या बहाण्याने आरटीओचे बनावट शिक्के असलेली कागदपत्रे दाखवून एका व्यावसायिकाला ५१ लाख ४५ हजार रुपयांना लुटल्याचा खळबळजनक प्रकार चिखलीत उघडकीस आला आहे.

पुण्यात मोठी फसवणूक (AI Image)
पुण्यात मोठी फसवणूक (AI Image)
पिंपरी-चिंचवड: बस विक्रीच्या बहाण्याने आरटीओचे बनावट शिक्के असलेली कागदपत्रे दाखवून एका व्यावसायिकाला ५१ लाख ४५ हजार रुपयांना लुटल्याचा खळबळजनक प्रकार चिखलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
वडगाव शेरी येथील व्यावसायिक रवींद्र विठ्ठल तानवडे (५०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी संजय नारायण पवार, सागर संजय पवार आणि सुवर्णा संजय पवार (सर्व रा. राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी तानवडे यांच्याशी संपर्क साधला होता. १४ मार्च २०२३ ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा डाव रचण्यात आला.
advertisement
अशी केली फसवणूक
आरोपींनी आपल्या मालकीच्या चार बस असल्याचे भासवून तानवडे यांचा विश्वास संपादन केला. विश्वासार्हता पटवण्यासाठी त्यांनी चक्क आरटीओचे (RTO) बनावट शिक्के मारलेली कागदपत्रे दाखवली. बस खरेदीसाठी तानवडे यांनी आरटीजीएस (RTGS) आणि रोख स्वरूपात एकूण ५१ लाख ४५ हजार रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी बसचा ताबा दिला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही बस न मिळाल्याने आणि पैसेही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तानवडे यांच्या लक्षात आले.
advertisement
पोलीस कारवाई
फिर्यादीनंतर चिखली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कार्यालयाचे बनावट शिक्के आणि कागदपत्रे तयार केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, पोलीस या रॅकेटचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सावधान! जुनी वाहनं घेताय? सरकारी कार्यालयाचे बनावट शिक्के अन् कागदपत्रं दाखवून होतोय खेळ, पुण्यात 51 लाखांची फसवणूक
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement