दरभंगा : कुवैतमध्ये झालेल्या भीषण अग्निकांडात अनेक भारतीयांचा जीव गेला. यामध्ये बिहारमधील गोपालगंज येथील शिव शंकर सिंह यांचाही समावेश आहे. दरभंगा येथील कालू खानही त्याच बिल्डिंगमध्ये काम करत होते. मात्र, अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही आहे. कालू खान याचे लग्न 15-20 जुलै दरम्यान, नेपाळमध्ये होणार होती.
त्याच्या घरी लग्नाची सर्व तयारी होत होती आणि कालू खान कुवैतहून 5 जुलैला येणार होता. त्याचे परतीचे तिकीटही झाले होते. मात्र, याचदरम्यान, त्या इमारतीमध्ये एक भीषण हादसा झाला. कालू खान याचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या गावात आणि कुटुंबाला मोठा हादरा बसला आहे.
advertisement
कालू खान हा दरभंगा जिल्ह्यातील नैनाघाट गावातील वार्ड नंबर 6 मधील इराकी टोला येथील रहिवासी मोहम्मद इस्माइल खान यांच्या दुसरी पत्नी मदीना खातून हिचा मुलगा आहे. तो 7 भाऊ आणि 5 बहिणींमध्ये एकुलता एक कमावणारा होता. त्याच्या पैशातूनच इकडे घराची उपजीविका भागवली जात होती. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याने आपल्या खांद्यांवर कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. त्याच्या एका बहिणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या दीड वर्षांच्या मुलाचेही पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर आहे.
त्याच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाशी माझे बोलणे झाले होते. घरात वीजेसाठी काही वायरिंगचे काम करायचे होते म्हणून त्यानेच कुवैतमधून कारागिरला कॉल करुन घरी बोलावले. जेव्हा कारागिर घरी आला तेव्हा मी त्याला 100 वेळा कॉल केला. तसेच कारागिरनेही कॉल केला. मात्र, त्याच्याशी कोणताच संपर्क होऊ शकला नाही. सायंकाळच्या वेळी गावातील लोकांकडून माहिती झाले की, ज्या मॉलमध्ये कालू खान काम करत होता, त्यात आग लागली आणि त्यामध्ये अनेक भारतीयांचा जळून मृत्यू झाला.
कालू खान याचे लग्न नेपाळमधील सिरहान येथे जुलै महिन्यात होणार होते. तर कालू खान याचा भाचा मोहम्मद ईद खान याने सांगितले की, तेथील राजदूत याबाबत शोध घेत आहे. तसेच कुवैतमध्ये राहणारे भारतीयही शोध घेत आहेत. मात्र, अजूनही कोणताच शोध लागलेला नाही.
नोकरी वाल्यांपेक्षा जास्त पैसे कमवायचे आहेत, तर मग आताच करा हे काम, सर्वांना कराल चकित!
कंपनीकडून हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला. त्याच्यावरही संपर्क होत नाही आहे. कालू खान याचा कोणताही शोध अद्याप लागलेला नाही. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्यादिवशी रात्री 11 वाजेपर्यंत त्याच्याशी चर्चा झाली. मात्र, सकाळी समोर आले की, ही दुर्घटना घडली.
