मुदस्सर खादियन खास, हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अझहर, खालिद अबू आकाशा आणि मोहम्मद हसन खान असं हल्ल्यात ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांची नावं आहेत. हे सर्व दहशतवादी लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे टॉपचे पाच दहशतवादी आहेत. या सर्वांचा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून खात्मा केला आहे.
advertisement
ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेले दहशतवादी
1. मुदस्सर खादियन खास
हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. तो मुरिदके येथील मारकझ तैय्यबाचा प्रमुख देखील आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मुदस्सरचा खात्मा झाल्यानंतर पाकिस्तान लष्कराकडून त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आली. तसेच पाकिस्तान आर्मी चीफ आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडून पुष्पचक्र देखील वाहण्यात आलं. एवढंच नव्हे तर ग्लोबर टेररिस्ट हाफिज अब्दुल रऊफ (JuD) याने देखील मुदस्सर याच्यासाठी नमाज पठण केलं. मुदस्सरच्या अंत्यविधीला लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे IG देखील उपस्थित होते.
2. हाफिज मुहम्मद जमील
हाफिज जमील हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. तो मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा असून मारकझ सुब्हान अल्लाह (बहावलपूर)चा तो प्रमुख आहे. तरुणांचं ब्रेन वॉशिंग करणं आणि दहशतवादी कृत्यांसाठी निधी संकलन करण्यात त्याचा सक्रीय सहभाग आहे.
3. मोहम्मद युसुफ अझहर
मोहम्मद अझहर हा देखील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. तो मौलाना मसूद अझहरचा मेहुणा आहे. तो हत्यार प्रशिक्षण प्रमुख आहे. IC-814 अपहरण प्रकरणात तो वाँटेड होता. काश्मीरमधील अनेक हल्ल्यात त्याचा सहभाग आढळून आला आहे.
4. खालिद अबू अकाशा
खालिद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. काश्मीरमधील विविध हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे. अफगाणिस्तानातून हत्यारांची तस्करी करण्यातही त्याचा मोठा वाटा आहे. त्याच्यावर फैसलाबादमध्ये अंत्यविधी करण्यात आला. वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि डिप्टी कमिशनर त्याच्या अंत्यविधीला उपस्थित होते
5. मोहम्मद हसन खान
मोहम्मद खान हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. तो मुफ्ती असघर खान काश्मीरी यांचा मुलगा असून जैश ए मोहम्मदचा कमांडर आहे. तो पाकव्याप्त काश्मिरमध्ये सक्रीय होता. तसेच काश्मीरमधील हल्ल्यांचे समन्वयक म्हणून त्याने काम केलंय.