भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली शस्त्रसंधी कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीशिवाय थेट भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेतून ठरली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. सध्या इतर कोणत्याही इतर मुद्द्यांवर किंवा तटस्थस्थळी चर्चा होणार नाही, असा कोणताही निर्णय झालेला नाही, असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानचे डीजीएमओ आणि भारताच्या डीजीएमओ यांच्यात फोनवरून संपर्क झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली. हा निर्णय सीमावर्ती भागात शांती आणि स्थिरतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट
दरम्यान काही वेळापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारत-पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी झाल्याचं सांगितलं. भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीस सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.