TRENDING:

Big Breaking: पाकिस्तानच्या टार्गेटवर दिल्ली, राजधानीत घडामोडी वाढल्या, सकाळी 11 वाजता लष्कराची प्रेस

Last Updated:

Delhi Under Attack: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील तीन दिवसांपासून दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Capital Delhi Under Attack: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील तीन दिवसांपासून दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यात येत आहे. काल रात्री पाकिस्तानने भारताच्या विविध भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने लेह-लडाखपासून भुजपर्यंत जवळपास ५० ड्रोनने भारतावर हल्ला केला होता. मात्र भारताने पाकिस्तानचा हा नापाक इरादा हाणून पाडला. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने सडेतोड उत्तर देत सगळे ड्रोन पाडले.
News18
News18
advertisement

यानंतर शुक्रवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानमध्ये घुसून तीन हवाई तळांवर हल्ला केला. इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडी हवाई तळ उद्ध्वस्त केलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने 'बुनियान उल मर्सूस' ऑपरेशन लाँच केलं आहे. या ऑपरेशनचा भाग म्हणून पाकिस्ताने थेट भारताची राजधानी दिल्लीवर मिसाईल सोडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून 'फतेह २' हे मिसाईल सोडण्यात आलं. मात्र भारताने हा हल्ला देखील परतवून लावला. भारताने हरियाणाच्या सिरसा परिसरात पाकिस्तानचं हे मिसाईल हाणून पाडलं.

advertisement

पाकिस्तानने थेट राजधानी दिल्लीवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केल्यानं भारतीय प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. भारतीय सैन्य देखील आता जशास तसं उत्तर देण्यास सज्ज झालं आहे. या मिसाईल हल्ल्याचा आता भारत दुप्पट ताकदीने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोन्ही देशातील हा संघर्ष दुसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता आहे.

advertisement

आज सकाळी १० ते ११ च्या दरम्यान, भारतीय सैन्याकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय सैन्याची भूमिका स्पष्ट केली जाऊ शकते. तसेच भारत पाकिस्तान संघर्षाची सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा देखील दिला जाऊ शकतो. भारताचं पुढचं पाऊल काय असू शकतं, याची माहिती देखील या पत्रकार परिषदेतून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रेस कॉन्फरन्सकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Big Breaking: पाकिस्तानच्या टार्गेटवर दिल्ली, राजधानीत घडामोडी वाढल्या, सकाळी 11 वाजता लष्कराची प्रेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल