हे विमान रशियाच्या पूर्व अमूर प्रदेशात होते तेव्हा त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. अंगारा एअरलाइन्सच्या An-24 विमानाच्या अपघातानंतर, या अपघातात 49 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. विमान त्याच्या गंतव्यस्थानापासून थोड्या अंतरावर असतानाच कोसळले. समोर आलेल्या माहितीनुसार, 43 प्रवाशी आणि सहा क्रू कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 बालकांचा समावेश आहे.
advertisement
स्थानिक आपत्कालीन विभागाने सांगितले की सायबेरियास्थित अंगारा एअरलाइन्सचे हे विमान अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ येत असताना रडार स्क्रीनवरून गायब झाले. प्रादेशिक राज्यपाल वसिली ऑर्लोव्ह यांनी सांगितले की AN-24 प्रवासी विमानात पाच मुले आणि सहा क्रू सदस्यांसह 43 प्रवासी होते. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर, बचाव आणि शोध मोहीम वेगाने राबवण्यात आली आणि त्याचा मलबा सापडला.
An-24 विमानाची खासियत काय?
AN-24 चे पूर्ण नाव अँटोनोव्ह-24 आहे. सोव्हिएत बनावटीचे मध्यम-श्रेणीचे डबल-इंजिन टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे. हे प्रामुख्याने कमी अंतराच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे आणि प्रादेशिक उड्डाणांसाठी वापरले जाते. ते पहिल्यांदा 1959 मध्ये उड्डाण केले होते आणि रशिया, पूर्व युरोप आणि आशियातील कठीण भागात उड्डाण करण्यासाठी डिझाइन केले होते. हे विमान सुमारे 1500 ते 2000 किलोमीटर उड्डाण करू शकते. त्यामुळे या विमानाचा वापर स्थानिक, प्रादेशिक पातळीवर केला जातो. त्याची खासियत म्हणजे ते लहान धावपट्ट्यांवरून उड्डाण आणि उतरू शकते, ज्यामुळे ते दुर्गम आणि डोंगराळ भागांसाठी योग्य समजले जाते. त्याच्या मजबूत आणि विश्वासार्ह डिझाइनमुळे, ते मालवाहू विमान आणि लष्करी वाहतूक म्हणून देखील वापरले जाते.
