जी-7 शिखर बैठकी दरम्यान होणारी बैठक टळल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटे चर्चा झाली. यापूर्वी, 22 एप्रिल रोजी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून शोक व्यक्त केला होता आणि दहशतवादाविरुद्ध अमेरिकेचा पाठिंबा पुन्हा जाहीर केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आज संवाद झाला.
ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती....
advertisement
पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले की 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करून जगासमोर आपला दहशतवादविरोधी निर्धार स्पष्ट केला होता.6-7 मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील फक्त दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले. भारताने केलेली कृती ही दहशतवाद्यांविरोधातील अचूक कारवाई होती. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला भारताकडून तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, हे पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले.
9 मे च्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून इशारा दिला की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करू शकतो. त्यांच्या इशााऱ्यानंतर भारतही ताकदीने हल्ला करेल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. त्यानंतर भारताने 9-10 मे च्या रात्री जोरदार आणि प्रभावी लष्करी प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आणि त्याचे काही हवाई तळ निकामी झाले. भारताच्या निर्णायक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला लष्करी कारवाया थांबवण्याची विनंती करण्यास भाग पाडले.
अमेरिकेची मध्यस्थी मान्य नाही...
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट केले की या संपूर्ण प्रकरणात कधीही भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. विद्यमान संप्रेषण माध्यमांद्वारे भारत आणि पाकिस्तानी सैन्यांमध्ये थेट युद्धबंदीचे समन्वय साधण्यात आले होते आणि ते पाकिस्तानच्या विनंतीवरून सुरू करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की भारताने कधीही कोणत्याही प्रकारची मध्यस्थी स्वीकारली नाही, स्वीकारणार नाही आणि कधीही स्वीकारणार नाही. या विषयावर भारतात पूर्ण राजकीय एकमत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. भारत आता दहशतवादाला प्रॉक्सी युद्ध म्हणून पाहत नाही, तर युद्धाच्या कृती म्हणून पाहतो आणि ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
ट्रम्प यांना भारत भेटीचे आमंत्रण...
दोन्ही नेत्यांनी फोनवरील चर्चेदरम्यान इंडो-पॅसिफिक प्रदेशावर, दोन्ही नेत्यांनी त्यांचे दृष्टिकोन सामायिक केले आणि या प्रदेशात QUAD च्या महत्त्वाच्या भूमिकेला पुन्हा पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदींनी पुढील क्वाड बैठकीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निमंत्रण स्वीकारले आणि भारत भेटीची उत्सुकता व्यक्त केली.