पंतप्रधान मोदी म्हणाले, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी चर्चा केली. सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. अलीकडील तणाववाढीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. पुढे जाण्यासाठी त्वरित तणाव कमी करण्याचे, संवाद व कूटनीतीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन पुन्हा एकदा केलं. क्षेत्रात शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी अशी मागणी केली.
इराणची अणु केंद्रे उद्ध्वस्त
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांची माहिती देताना सांगितले की, इराणची अणुउर्जा केंद्रे पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. यासोबतच ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की- जर त्यांनी प्रतिउत्तर दिले, तर आणखी प्रचंड हल्ले करण्यात येतील.
अमेरिकेने केली सर्वात मोठी चूक, महायुद्धापेक्षा भयानक; बुश सारखे फसणार ट्रम्प
इराणमध्ये शांतता नसेल, तर भयंकर...- ट्रम्प
ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, अमेरिका अचूकता, वेग आणि कौशल्य यांद्वारे अशा आणखी केंद्रांवर निशाणा साधू शकतो. व्हाइट हाऊस मधून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना त्यांनी म्हटलं, इराणमध्ये शांतता प्रस्थापित होईल किंवा मागील आठवड्याभरात जे घडले त्यापेक्षा कितीतरी पटींनी भयंकर त्रासदी पाहायला मिळेल.
फोर्डो केंद्रावर ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब हल्ला
दरम्यान, इराणच्या अणुऊर्जा संस्थेने फोर्डो, इस्फहान आणि नतांज येथील अणु केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांची पुष्टी केली. तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, शत्रूंच्या कटकारस्थानांनंतरही इराण पुन्हा उभं राहील – कारण आमच्याकडे हजारो क्रांतिकारी आणि समर्पित वैज्ञानिक व तज्ज्ञ आहेत. एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकन लष्कराने पर्वतरांगांमध्ये वसलेल्या फोर्डो अणुऊर्जा संवर्धन केंद्रावर ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब टाकून निशाणा साधला.