कोटा, 2 ऑगस्ट : पावसाळ्यात अनेक विषारी प्राणी बिळातून बाहेर पडतात आणि अंधाऱ्या, अडगळीच्या ठिकाणी आसरा शोधतात. त्यामुळे लोकवस्तीच्या भागातही साप, विंचू यांसारखे खतरनाक प्राणी आढळतात. राजस्थानच्या कोटा भागात तर एका घराबाहेर चक्क 6 फूट लांब कोब्रा जातीचा नाग वेटोळा घालून बसला होता. घरमालकाच्या सूचनेनंतर सर्पमित्रांनी त्याला जिवंत सुरक्षितस्थळी नेऊन सोडलं. परंतु या सगळ्यात एका निष्पाप पोपटाने मात्र आपला जीव गमावला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, खेडली फाटक भागात कामगारांची घरं आहेत. यापैकी एका घराबाहेर पोपटाचा पिंजरा होता. रात्रीच्या अंधारात या पिंजऱ्यात भलामोठा कोब्रा शिरला. पोपटाला त्याने एका क्षणात आपली शिकार बनवलं आणि स्वतः तिथेच थांबला. सकाळी घरमालक बाहेर आले असता, त्यांनी अंगणात जिवंत कोब्रा पाहिला. मात्र भीतीने त्यांचे हात-पाय थरथर कापले नाहीत किंवा ते जीव मुठीत घेऊन पळालेही नाहीत. तर, त्यांनी मोठ्या जिकरीने सापाला तिथून हाकलवून लावलं. सापही निमूटपणे निघून गेला पण तो कायमचा गेलेला नव्हता. दुसऱ्या रात्री तो पुन्हा आला...
संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेची हत्या; मग मृतदेहासोबतच केलं हादरवणारं कृत्य
दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताच घरमालकांना तोच कोब्रा दिसला. मात्र यावेळी त्याचं पूर्ण शरीर पोपटाच्या पिंजऱ्याच्या आत होतं. त्यामुळे ते त्याला हाकलवू शकत नव्हते. शिवाय हा आता रोजचा त्रास होणार, हे लक्षात घेऊन त्यांनी याबाबत सर्पमित्रांना माहिती दिली. सर्पमित्र गोविंद शर्मा हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या 6 फूट लांब नागाला यशस्वीरित्या ताब्यात घेतलं आणि याबाबत वनविभागाला कळवलं. त्यानंतर नागाला सुखरूपपणे जंगलात सोडण्यात आलं.
Shravan: स्वप्नात झाला होता साक्षात्कार! 5 लाख रुद्राक्षांनी बनवलं 20 फूट उंच शिवलिंग
दरम्यान, गोविंद शर्मा यांनी सांगितलं की, 'कोणत्याही प्राण्याला त्रास दिल्याशिवाय तो उलटून आपल्याला त्रास देत नाही. सापाच्याबाबतही असंच आहे. तो स्वतःच्या संरक्षणासाठी दुसऱ्यांवर हल्ला करतो. त्याला डिवचल्याशिवाय तो कोणाला त्रास देत नाही. त्यामुळे साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका, त्याबाबत सर्पमित्रांना माहिती द्या.'