नेमकं काय घडलं -
मुंबईमध्ये 13 मे रोजी झालेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत इंदूर विमानतळाचे माजी डायरेक्टर मनोज चंसोरिया यांचेही निधन झाले. चंसोरिया हे त्यांची पत्नी अनिता यांचा अमेकिरेचा व्हिसाबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबईला गेले होते. याठिकाणी होर्डिंग दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 60 तास उलटूनही बचावकार्य सुरूच
advertisement
मुंबईहून ते इंदूर येथे येणार होते. दोन दिवस पर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर इंदूरसह संपूर्ण पश्चिम विभागाचे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, मंगळवारी रात्रीच्या सुमारास मनोज चंसोरिया यांची कार घाटकोपर येथील या होर्डिंगखाली दबल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत चंसोरिया आणि त्यांची पत्नीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर लगेचच एनडीआरएफने त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. हे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
ते तीन वर्ष इंदूर विमानतळाचे प्रमुख होते. इंदूर येथील त्यांची दिल्ली मुख्यालयात बदली झाली होती. त्यानंतर ते अमृतसर विमानतळाचे प्रमुख बनले होते. याचवर्षी 28 मार्च रोजी ते निवृत्त झाले. तसेच जबलपूर येथे राहत होते. इंदूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सातत्याने इंदूर येथे जाणे-येणे होत होते. त्यांचा मुलगा यश अमेरिकेत राहते. ते त्याच्याकडेच जाणार होते. पत्नीच्या व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 11 मे रोजी ते स्वत:च्या कारने जबलपूर येथून मुंबईला गेले होते. तेथून परत येताना त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली.
घाटकोपर होर्डिंग प्रकरणी नवा VIDEO समोर, काळजात धडकी भरवणारे ते 3 सेकंद
दोन दिवस घेतला शोध -
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या आपल्या मित्रांची भेटही घेतली. यानंतर ते तिथून निघाले. मात्र, जेव्हा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा ते इंदूरऐवजी जबलपूर येथे चालले गेले, असे सर्वांना वाटले. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. ते फोनही उचलत नव्हते. मात्र, मंगळवारी रात्री घाटकोपर येथे रेस्क्यू करताना एनडीआरएफच्या टीमने त्यांचा फोन उचलत या दुर्घटनेची माहिती दिली. दरम्यान, ही माहिती समोर येताच इंदूर विमानतळावर शोककळा पसरली.
