मुजफ्फरपुर : भगवे कपडे, डोक्यावर फेटा, मोठ्या मिशा आणि दाढी पाहून तुम्ही एखाद्या व्यक्ती साधू किंवा संत समजाल. मात्र, एका व्यक्तीची वेशभूषा अशीच आहे. पण हा व्यक्ती साधू नव्हे तर बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला सरकारी शिक्षक आहे.
नरेंद्र सिंह असे त्यांचे नाव आहे. ते आता बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एका हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देणार आहेत. नरेंद्र सिंह हे कबीर आश्रम जीवन ज्योती केंद्र पूर्णियाशी जोडले गेले होते. ते त्याठिकाणी कबीरवाणीच्या माध्यमातून अनुयायांना सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश द्यायचे.
advertisement
मुजफ्फरपुरच्या साहेबगंज परिसरातील अहियापुर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात ते विद्यार्थ्यांना संगिताचे धडे देणार आहेत. पताही येथील टीचर्स ट्रेंनिंग कॉलेज येथून शिक्षक प्रशिक्षणाचे सेशन पूर्ण केल्यावर जेव्हा ते योगदान करायला आले तेव्हा ते लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनले.
बीपीएससी शिक्षक नरेंद्र सिंह (साधु बाबा) यांनी लोकल18 बोलताना सांगितले की, जेव्हा ते शाळेत शिकवायला जातात तेव्हा मुले खूप प्रभावित होतात. भगवे कपडे पाहिल्यानंतरही आजूबाजूचे लोक कोणताही प्रश्न विचारत नसल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू आणि मुस्लिम सर्वांचे सहकार्य आहे. लोकांची मानसिकता होती की, संत झाल्यावर अभ्यास करायचा नाही, पण माझी मानसिकता वेगळी आहे.
Girlfriend सोबत शारीरिक संबंध, Pregnant झाल्यावर लग्नाला नकार, पाहा, पुढे काय घडलं?
समाजात कबीर साहेब आणि सनातनचा संदेश वाटूनही अभ्यास करता येतो, मुलांनाही शिकवता येते. दोन्ही कार्य शिक्षणाची आहेत. त्यांचे गुरू धर्मस्वरूप साहेबही प्राध्यापक होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही आश्रमाशी संलग्न असतानाच संगीतात पदव्युत्तर पदवीही घेतली, असे ते सांगतात.
उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती -
नरेंद्र सिंह यांनी पुढे सांगितले की, काही काळ ते बाबा रामदेव यांच्यासोबतही राहिले. नंतर त्यांनी मधेपुरा जिल्ह्यातील यूवीके कॉलेजमध्ये मानधनावर अध्यापन केले. या काळातही अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच होती. या दरम्यान त्यांनी STET ही परीक्षा उत्तीर्ण केली. यानतंर नुकतीच BPSC मधून शिक्षक भरती निघाली तेव्हा मी फॉर्म भरला आणि परीक्षा उत्तीर्णही केली. आता त्यांची मुझफ्फरपूरच्या साहेबगंज ब्लॉकमधील अहियापूरच्या उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.