आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तिरुपतीला प्रसाद म्हणून मिळणार्या लाडवात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळून मंदिराची पवित्रता खराब केल्याचा आरोप केला होता. मात्र वायएसआर काँग्रेस पार्टीकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. आता हे प्रकरण चांगलंच तापलं असून या प्रकरणात मंदिराचे माजी मुख्य पुजारी रमण दीक्षाथलु यांनी मोठा खुलासा केला आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले माजी पुजारी
या प्रकरणात माजी मुख्य पुजारी दीक्षाथलु यांनी मोठा खुलासा केला आहे. 'मी काही वर्षांपूर्वी तिरुपतीला प्रसाद म्हणून जे लाडू तायर करण्यात येतात त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गायीच्या तुपात भेसळ होत असल्याचं पाहिलं होतं. मी यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि मंदिराच्या प्रमुखांकडे तक्रार केली होती. मात्र यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.'
त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, मागील पाच वर्षांमध्ये तिरुपतीला प्रसाद म्हणून मिळणार्या लाडवात प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल मिसळवण्याचं महापाप या लोकांनी केलं. मात्र आता आपल्याला हे सुनिश्चित करावं लागले की असं पाप पुन्हा होणार नाही. या मंदिरासोबत कोट्यवधी भाविकांची श्रद्धा जोडली गेली आहे.
रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे?
सेंटर ऑफ ॲनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड, किंवा CALF, गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात YSRCP सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची उपस्थिती उघड झाली. अहवालात असे सूचित केले आहे की तुपात फिश ऑइल, बीफ टॉलो आणि लार्डचे अंश आहेत; तसेच त्यात अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे जे डुकराच्या फॅटी टिश्यूचे प्रस्तुतीकरण करून प्राप्त होते, त्याचा वापर देखील केला गेला आहे.