गोड्डा : आधीच्या काळात नेहमी अनेक जण आपल्या घरातील भांडे, सायकल आणि आणखी किंमती वस्तू चोरू होऊ नयेत म्हणून त्यावर लोखंडाच्या खिळ्याने नावे लिहायचे. यामुळे जर भांडे किंवा सायकल चोरी झाली, किंवा त्याची अदलाबदल झाली तर सामान्यत: त्याची ओळख करायला सोपे जायचे. आजही भारताच्या अनेक राज्यांमध्ये हा प्रकार दिसतो.
झारखंड राज्यातील गोड्डामध्येही हा प्रकार दिसतो. अनेकजण आपल्या सायकल किंवा घरातील भाड्यांवर नावे लिहून घेतात. ग्रामीण भागात असे अनेक कामगार आहेत, जे गावागावामध्ये फिरतात आणि भांडी, लोखंडी वस्तूंवर नावे लिहितात.
advertisement
भांड्यांवर नावे लिहिणाऱ्या मनोज शाह यांनी सांगितले की, ते बिहारच्या भागलपुर जिल्ह्यातील सनहौला गावाचे रहिवासी आहेत. अनेक वर्षांपासून ते गावोगावी फिरून हे काम करत आहेत. काही ठिकाणी गावांमधील लोक आजकाल भांड्यांवर नावे टाकायला किंवा सायकलवर नावे टाकण्यासाठी तितके इच्छुक नसतात. मात्र, आजही अशा लोकांची सख्या जास्त आहे जे आपल्या वस्तूची सुरक्षा चांगल्याप्रकारे करू इच्छितात. काही लोक असेही आहेत जे हौसेखातर आपल्या घरातील भांड्यांवर तसेच इतर वस्तूंवर नावे लिहून घेतात.
#RamAayenge : महाराष्ट्रातील या कळसाने होणार प्रभू श्रीरामाचा जलाभिषेक, असं असणार आयोजन
एका अक्षराचे 10 रुपये -
मनोज यांनी सांगितले की, ते कोणत्याही धातूच्या वस्तूवर नावे लिहून देतात. यासाठी प्रति अक्षर ते 10 रुपये आकारतात. जर एखाद्या व्यक्तीचे नाव सायकलवर लिहिले असेल तर त्याच्याकडून 80 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. हिंदी आणि इंग्रजी शब्दांमध्ये छिन्नी आणि हातोड्याच्या मदतीने ही अक्षरे धातूवर कोरली जातात. दिवसभर ग्रामीण भागात फिरून रोज 500 ते 600 रुपये कमावल्याचे मनोजने सांगितले.
सायकलवर आपले नाव लिहिलेल्या सौरव मंडलने सांगितले की, आपल्या सायकलची शाळेत अदलाबदली होऊ नये, तसेच जर कधी सायकलची चोरी झाली, तर त्याबाबत आपल्या माहिती व्हावी यासाठीही आपल्या सायकलवर आपले नाव लिहून घेतले आहे. त्याच्या सायकलवर त्याचे लिहिले आहे, हे पाहून त्याला चांगले वाटत असल्याचेही त्याने सांगितले.