माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत अनेक प्रभावशाली महिला भारतीय राजकारणाने पाहिल्या आहेत. आजही देशातील अनेक राजकीय पक्ष, मंत्रिमंडळं आणि प्रशासनात महिला आहेत. त्यांची संख्या कमी असली तरी ती महत्त्वाची आहे या बाबत कुणाचंही दुमत असण्याची शक्यता नाही. भारतीय राजकारणातील महिलांबद्दल बोलायचं तर काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. 90 च्या दशकात पक्षाची घसरण सुरु झाली असता त्याला पुनरुज्जीवित करण्याचं श्रेय सोनिया गांधी यांना जातं. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठा विजय मिळवला.
advertisement
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ऑल इंडिय तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या देशातल्या एक प्रमुख महिला नेत्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला निर्भिडपणे आव्हान देणाऱ्या नेत्या अशी त्यांची ओळख आहे. पश्चिम बंगालमधील 34 वर्षांची कम्युनिस्ट पक्षाची सल्ला उलथवून टाकण्याचं श्रेय ममतांना जातं. ही सत्ता उलथवून 2011 मध्ये त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यानंतर पश्चिम बंगालच्या जनेतेने त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री केलं आहे यातूनच त्यांचं भारतीय राजकारणातल स्थान स्पष्ट होतं.
देशातील महिला राजकारण्यांचा उल्लेख मायावती यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. बहुजन समाज पक्षाच्या त्या अध्यक्षा आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या फायरब्रँड नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देशातील एक प्रभावशाली महिला राजकारणी आहेत. 2002 मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केलं. त्या पूर्वी त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रातही लोकप्रियता मिळवली आहे. ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’ या हिंदी टीव्ही मालिकेतील प्रमुख भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली होती.
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राजकीय कारकीर्दही महत्त्वाची आहे. 2006 पासून त्या भाजपमध्ये आहेत. देशाच्या संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे.
काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांचा पक्षीय राजकीय नेतृत्वात तिसरा क्रमांक लागतो. सध्या त्या पक्षाच्या जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. कधीही निवडणुकीच्या रिंगणात न उतरताही त्या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव देशातील महिला राजकारण्यांमध्ये प्रामुख्याने घेतलं जातं. त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत आणि महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.
आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी सिंग या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून 2012 पासून त्या राजकारणात सक्रिय आहेत.
भारतीय राजकारणातील महिलांचा उल्लेख करताना जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांचं नाव घेणं आवश्यक आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे या राजघराण्यातल्या असून त्यांनी दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
या व्यतिरिक्त नॅशनल पीपल्स पार्टीच्या मेघालयातील खासदार अगाथा संगमा यांनीही राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मलिवाल आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर बादल या महिलांनीही भारतीय राजकारणावर आपली छाप उमटवली आहे.
