ओळख पुसली अन् अंधाऱ्या खोलीत आयुष्य गाडलं
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मांतर होताच प्रियांकाचे सर्व शैक्षणिक दाखले, ओळखपत्रं सासरच्यांनी काढून घेतले. जणू तिची जुनी ओळख पूर्णपणे पुसण्याचा हा प्रयत्न होता. सुरुवातीला गोड बोलणाऱ्या पतीचं रूप लग्नानंतर काही काळातच बदललं. मुलांना जन्म दिल्यानंतर तरी परिस्थिती सुधारेल असं तिला वाटलं होतं, पण प्रताडनेचा हा डोंगर दिवसागणिक वाढतच गेला.
advertisement
२०२२ मध्ये पतीने तिला घराबाहेर काढलं आणि भाड्याच्या घरात ठेवून बाहेर काम करण्यासाठी सक्ती केली. कुटुंबासाठी ती 'इव्हेंट प्लॅनर' म्हणून काम करू लागली, पण घामाच्या पैशांवरही पतीने डल्ला मारला. जेव्हा जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा तिला एका अंधाऱ्या खोलीत तासनतास कोंडून ठेवलं जायचं. या एकाकीपणामुळे तिचा मानसिक तोलही ढासळू लागला होता.
पोटच्या गोळ्यांसाठी वणवण
२८ मे २०२५ ची ती काळरात्र या पीडितेसाठी शेवटचा घाव ठरली. बेदम मारहाण करून तिला घरातून हाकलून देण्यात आलं. क्रूरतेचा कळस म्हणजे, तिच्या काळजाचे तुकडे असलेल्या पोटच्या मुलांना तिच्यापासून हिरावून घेतलं आणि कुठेतरी लपवून ठेवलं. आज ही आई आपल्या मुलांच्या भेटीसाठी व्याकुळ आहे, पण तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जीवाच्या भीतीने ती आज आपलं ठिकाण बदलून लपून राहाते.
२० वर्षांनंतर न्यायाची हाक
अखेर सोसण्याची मर्यादा संपल्यावर या महिलेने मडियांव पोलीस ठाण्यात धाव घेतली. इन्स्पेक्टर शिवानंद मिश्रा यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. कॉलेजमध्ये असताना पाहिलेलं ते प्रेमाचं स्वप्न आज एका भयाण वास्तवात बदललं आहे. धर्मांतराच्या नावाखाली एका स्त्रीचं अस्तित्व कसं संपवलं जातं, याची ही हृदयद्रावक कहाणी आज संपूर्ण उत्तर प्रदेशात चर्चेचा विषय ठरली आहे.
