याशिवाय सुवेंदू अधिकारी त्यांच्या पारंपरिक नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 10 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
दिलीप घोष खरगपूर सदरमधून
भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांना खरगपूर सदर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अभिनेते रुद्रनील घोष हेशिबपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
अर्जुन सिंह पुत्र पवन सिंह यांना भटपारा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अग्निमित्र पॉल या आसनसोल दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. याशिवाय फांसीदेवा येथून दुर्गा मुर्मू आणि तारकेश्वर येथून शांतनु पान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
advertisement
मागील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध विजय
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यावेळी सुवेंदू अधिकारी दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतून नंदीग्राम आणि भवानीपुर निवडणूक लढवणार आहेत. हा निर्णय थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिलेले मोठे आव्हान मानला जात आहे.
नंदीग्राम मतदारसंघाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण 2021 च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी याच मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. दुसरीकडे भवानीपुर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपरिक आणि मजबूत मतदारसंघ मानला जातो. 2021 च्या निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी याच मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून पुन्हा विधानसभेत प्रवेश केला होता.
या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच थेट आव्हान देण्याची आक्रमक रणनीती आखल्याचे मानले जात आहे.
क्रिकेटर अशोक डिंडालाही उमेदवारी
भाजपने माजी भारतीय वेगवान गोलंदाज अशोक डिंडा यालाही उमेदवारी दिली आहे. त्याला मोयना मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वेगवान आणि आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे डिंडा आता राजकीय क्षेत्रात नव्या इनिंगची सुरुवात करत आहेत.
