दोन लग्न म्हणजे एकाला घटस्फोट देऊन दुसऱ्याशी लग्न केलं असं नाही. तर इथे एका महिलाचं एकाच वेळेला दोन लग्न होतात. हो तुम्ही बरोबर ऐकलंत. या महिलेला एकाच वेळी दोन नवरे असतात आणि ती दोघांसोबत ही रहाते आणि दोघांची काळजी घेते, आश्चर्य म्हणजे कोणत्याच नवऱ्याला याबद्दल आपत्ती नाही, उलट ते आनंदाने लग्न करतात.
advertisement
आता भारतात ही अशी परंपरा आहे म्हटल्यावर त्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक लोकांना उत्सुकता असेल. चला याबद्दल जाणून घेऊ.
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात घडलेली एक सत्य घटना समोर आली आहे, ज्यामुळे ही परंपरा चर्चेत आली.
सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावात राहणारे प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन भावांनी 13 जुलै रोजी एकाच वधू सुनीताशी लग्न केलं. या विवाहाला “जोडीदार प्रथा” म्हणतात. हिमाचल आणि उत्तराखंडातील काही समुदायांत ही प्रथा आजही आढळते.
यामध्ये एका कुटुंबातील सर्व भावांचं लग्नं एका मुलीशी केलं जातं, काहीवेळा एका मुलीचे पाच भावांशीही लग्न होऊ शकते. या परंपरेला “पांचली प्रथा” असंही म्हटलं जातं.
या विवाहामुळे दोन्ही भाऊ देशभरात चर्चेचे विषय बनले. मात्र, सुरुवातीला त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांनंतर कपिल नेगी परदेशात नोकरीसाठी बहरीनला रवाना झाला. त्याने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. त्यावर भाऊ प्रदीपने भावनिक पोस्ट लिहिली. “भाई, लहानपणापासून आजवरच्या सगळ्या आठवणी तुझ्याशी जोडलेल्या आहेत. तुझ्याशिवाय घर ओसाड वाटतंय. लवकर परत ये…” अशा शब्दांत त्याने आपली भावनिक भावना व्यक्त केली.
आजवर शांत राहिलेली सुनीता हिने देखील सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिलं “नवीन गोष्टी चांगल्या वाटतात, पण जुन्या आठवणी सर्वात सुंदर असतात. मिस यू बोथ ऑफ माय पार्टनर्स अँड लव यू!” तिच्या या पोस्टनंतर या विवाहाची चर्चा पुन्हा एकदा रंगली.
प्रदीप आणि कपिल या दोघांच्या आयुष्यात अलीकडेच दुःखद घटना घडली होती. त्यांचे वडील कॅन्सरशी झुंज देत होते आणि गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं. त्यावेळीही या दोन्ही भावांनी सोशल मीडियावरून आपलं दुःख व्यक्त केलं होतं.
सिरमौर जिल्ह्यातील हाटी समाजात ही जोडीदार प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे. एका स्त्रीचं एका कुटुंबातील सर्व भावांशी लग्न केल्याने मालमत्ता आणि कुटुंबातील एकोपा टिकतो, असं सांगितलं जातं. मात्र, आधुनिक काळात या प्रथेवर अनेकदा प्रश्नचिन्हं उपस्थित होतात. तरीही या घटनेनं पुन्हा एकदा या परंपरेला चर्चेत आणलं आहे.