दिल्ली : दिल्ली ही भारताची राजधानी आहे. याठिकाणी देशभरातील लोक रोजगाराच्या शोधात येतात. यामध्ये अनेक जण अविवाहित असतात. त्यामुळे ते एकतर एकटे राहतात किंवा आपल्या मित्रांसोबत राहतात. ऑफिसमध्ये बॉससोबत झालेल्या वादामुळे किंवा कामाच्या तणावामुळे अनेकदा मग घरी आल्यावर जेवण बनवायची त्यांची इच्छा नसते आणि ते घरच्या जेवणाला खूप मिस करतात.
advertisement
त्यामध्ये काही जणांना भंडारा दिसला तर त्याठिकाणी जेवण्याची इच्छा असते. यातच आता भंडाऱ्यामध्ये जेवण करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आता तुम्हाला कुठेही भंडारा शोधायला जायची गरज नाही. कारण एक असे अॅप तयार करण्यात आले आहे, जे शहरात कुठे भंडारा होत आहे, याची माहिती देईल. या अॅपचे नाव भंडारा अॅप आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे अॅप फुली फंक्शनल अॅप आहे. अब भूखे नही रहोगे, अशी या अॅपची टॅगलाईन आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या हिमांशु जादोन याने हे अॅप तयार केले आहे.
कार्स 24 कंपनीमध्ये काम करत असताना हिमांशुला आणखी एका आव्हानाचा अनुभव आला. त्यांच्या संपूर्ण टीमला काम करण्यासाठी मैदानात उतरावे लागायचे आणि फ्री जेवणाचा शोध आता त्यांच्या चर्चेचा एक मुद्दा बनला होता. ते आता त्या ठिकाणांची माहिती देणार, ज्याठिकाणी त्यांना फ्रीमध्ये जेवण मिळेल. यातच हिमांशुला एक कल्पना सुचली. त्याने विचार केला की, त्यांच्यासारखे कितीतरी लोक, विद्यार्थी आणि इतरही अनेक लोकांना या माहितीचा लाभ मिळू शकतो आणि त्यांनी हे अॅप तयार केले.
अशी मिळेल पूर्ण माहिती -
हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर टाकून लॉगइन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल आणि ओटीपी टाकल्यावर अॅप सुरू होईल. यानंतर आजूबाजूला असलेल्या भंडाऱ्यांबाबत माहिती तुम्हाला मिळेल. तसेच हा भंडारा कधीपासून कधीपर्यंत चालेल, यासह गुगल मॅपचीही माहिती मिळेल.
मी त्याच मुलाला भेटायला छतावर आली.., मुलीचे शब्द ऐकताच आई वडिलांनी केलं भयानक कृत्य
यामुळे ज्याठिकाणी भंडारा सुरू असेल, त्याठिकाणी तुम्ही सोप्या पद्धतीने पोहोचू शकतात. तसेच जर तुम्हीही भंडारा करत असाल, तर तुम्हीही याबाबतची माहिती देऊ शकतात. तुम्ही फोटोवर क्लिक करून भंडारा कोठे आयोजित केला आहे त्याचा संपूर्ण पत्ता टाकू शकता. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी हे ॲप डाऊनलोड करत आहे. https://bhandara.app/ या वेबसाईटवरही तुम्ही जाऊ शकतात. तसेच या नावाने या अॅपची LinkedIn ID आहे.
